पुणे : विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं लक्ष लागून राहिलेल्या इयत्ता बारावीचा निकाल लागला आहे. यंदा इयत्ता बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. या निकालात पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली आहे. इयत्ता बारावीत 93.73 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 89.14 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. तर मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारत कमाल केली आहे. तर त्याखालोखाल पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि मुंबई विभागाने कामगिरी केली आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 96.01 टक्के निकाल लागला आहे. तर मुंबई विभागाचा सर्वात कमी 88.13 टक्के निकाल लागला आहे. निकालाच्या टक्केवारीत पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुण्याचा 93.34 टक्के निकाल लागला आहे.
कोकण 96.01 टक्के
पुणे 93.34 टक्के
कोल्हापूर 93.28 टक्के
औरंगाबाद 91.85 टक्के
नागपूर 90.35 टक्के
अमरावती 92.75 टक्के
नाशिक 91.66 टक्के
लातूर 90.37 टक्के
मुंबई 88.13 टक्के
यंदा इयत्ता बारावीच्या परीक्षेत एकूण 91.25 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. त्यात विद्यार्थींनींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. या परीक्षेत एकूण 6,84,118 विद्यार्थी पास झाले आहेत. तर 6,08,350 विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत.
दुपारी 2 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. त्याचवेळी विद्यार्थ्यांना ऑनलाईनच उत्तर पत्रिकाही काढून घेता येणार आहे.
mahahsscboard.maharashtra.gov.in
mahresult.nic.in
या दोन संकेतस्थळावर इयत्ता बारावीचा निकाल पाहता येणार आहे. दरम्यान, परीक्षा मंडळाने बारावीच्या टॉपर्सची यादी काढणं बंद केलं आहे. त्यामुळे इयत्ता बारावीत कोण पहिलं आलं आणि कोण दुसरं आलं हे कळू शकणार नाही.
स्टेप एक : परीक्षा मंडळाच्या ऑफिशियल वेबासाईटवर जा
स्टेप दोन : होमपेजवर दिसणाऱ्या बोर्ड रिझल्टच्या लिंकवर क्लिक करा
स्टेप तीन : नव्या पेजवर तुमचा सीट नंबर टाकून सबमिट करा
स्टेप चार : त्यानंतर रिझल्ट तुमच्या स्क्रिनवर येईल
स्टेप पाच : विद्यार्थी आपल्या मार्कशीटची प्रिंटही काढू शकतील