मुंबई महापालिकेकडून आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारांची घोषणा, 50 शिक्षकांना बहुमान

| Updated on: Sep 03, 2021 | 8:00 AM

भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली डॉ.राधाकृष्णन यांचा दिनांक 05 सप्टेंबर हा जन्मदिवस, त्यांची स्मृती चिरंतन रहावी म्हणून या दिवशी “आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराने“ शिक्षकांना सन्मानित करण्यात येते.

मुंबई महापालिकेकडून आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारांची घोषणा, 50 शिक्षकांना बहुमान
आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
Follow us on

मुंबई: भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली डॉ.राधाकृष्णन यांचा दिनांक 05 सप्टेंबर हा जन्मदिवस, त्यांची स्मृती चिरंतन राहावी म्हणून या दिवशी “आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराने“ शिक्षकांना सन्मानित करण्यात येते. आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार सन 2020-21 च्या पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केली. याप्रसंगी उप महापौर अँड. सुहास वाडकर, सभागृह नेते विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, स्थापत्य समिती अध्यक्ष (शहर) दत्ता पोंगडे, शिक्षणाधिकारी (प्रभारी) राजू तडवी तसेच सबंधित महापालिका अधिकारी उपस्थित होते.

1971 पासून परंपरा

शिक्षण विभागातील महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा,खासगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक शाळांमधील जे शिक्षक ज्ञानदानाचे व विद्यार्थी घडविण्याचे पवित्र कार्य प्रामाणिकपणे करीत आहेत,त्यांचा यथोचित गौरव करण्याची परंपरा सन 1971 पासून 02 शिक्षकांना पुरस्कृत करुन सुरु झाली. तदनंतर वेळोवेळी यामध्ये बदल होऊन आजमितीस 50 आदर्श शिक्षकांना “महापौर पुरस्काराने ” गौरविण्यात येते.

महापौरांच्या हस्ते सन्मान होणार

महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा,खासगी अनुदानित शाळा व विना अनुदानित प्राथमिक शाळांतील आदर्श आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत व्रत स्वीकारलेल्या 50 शिक्षकांना प्रत्येकी रु. 10 हजार रुपये मुंबई महानगरपालिका यांच्यावतीनं दिले जाणार आहेत. याशिवाय मानचिन्हाचे सोन्याचा मुलामा दिलेले पदक , प्रमाणपत्र,शाल,श्रीफळ व फेटा देऊन महापौरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे. मार्च महिन्यात निवड समितीने 130 शिक्षकांच्या मुलाखती घेऊन त्यातून एकूण 50 शिक्षकांची महापौर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

सन 2020-21 च्या पुरस्कारासाठी आदर्श शिक्षकांची निवड करण्याकरिता मनपा प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित शाळा व विनाअनुदानित शाळांतील एकूण 130 शिक्षकांच्या मुलाखती घेऊन त्यातून 50 आदर्श शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.

इतर बातम्या:

एकनाथ खडसेंच्या वाढदिवशी जयंत पाटलांचं आगळंवेगळं गिफ्ट, जळगाव जिल्ह्यातील सिंचन योजनेचा शुभारंभ

नोकरीच्या मागं न लागता कृषी क्षेत्रात क्रांती आणा, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचं आवाहन

पुण्यात घटस्फोटासाठी जातपंचायतऐवजी न्यायालयात गेल्यानं बहिष्कार, अंनिसच्या पाठपुराव्यानं 14 जणांवर गुन्हा दाखल

Mumbai Mayor Kishori Pednekar declared Ideal Teacher Award of BMC