Mumbai School Reopen: मुंबईतील शाळांची घंटा उद्याच वाजणार, पहिली ते सातवीचे वर्ग सुरु करण्याचे आदेश

| Updated on: Dec 14, 2021 | 7:43 AM

मुंबई महापालिका (BMC) क्षेत्रात तब्बल दीड वर्षाहून अधिक काळानंतर बुधवारी पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत.

Mumbai School Reopen: मुंबईतील शाळांची घंटा उद्याच वाजणार, पहिली ते सातवीचे वर्ग सुरु करण्याचे आदेश
School
Follow us on

मुंबई: राज्यातील कोरोना (Corona) विषाणू संसर्ग आटोक्यात आल्यानंतर 1 डिसेंबरपासून ऑफलाईन शाळा सुरु (Maharashtra School Reopen) करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, मुंबईतील शाळा (Mumbai School) उद्यापासून सुरु होत आहेत. मुंबई महापालिका (BMC) क्षेत्रात तब्बल दीड वर्षाहून अधिक काळानंतर बुधवारी पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

शाळा सुरु करण्यासंदर्भात आज तातडीची बैठक

मुंबई महापालिका शिक्षण विभागाकडून शाळा सुरु करण्यासंदर्भात जोरदार तयारी करण्यात आली आहे. या वेळी शाळा कोणत्याही स्थितीत सुरू केल्या जाणार असून यामध्ये तूर्तास कोणताही बदल होणार नाही, असे स्पष्टीकरण महापालिका शिक्षण विभागाकडून देण्यात आले.मात्र, काही शाळांना याविषयीची माहिती मिळाली नसल्याने त्या पुन्हा सूचना देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. शाळा सुरू करण्यासाठी आज मंगळवारी, 14 डिसेंबर रोजी सकाळी एक आढावा बैठक बोलावण्यात आली असून त्यात काही राहिलेल्या त्रुटींवर तातडीने मार्ग काढले जाणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यानी सांगितले.

ओमिक्रॉनमुळं पालकांमध्ये धास्ती

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या ओमायक्रोन या व्हेरीएटमुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे या शाळा सुरू होतील की नाही, अशी सांशकता ही पालकांमध्ये व्यक्ती केली जात आहे त्या पार्श्वभूमीवर आज महापालिका शिक्षण विभागाने मुंबईतील शाळा आपल्या नियोजित तारखेनुसार सुरू होणार असल्याचे स्पष्ट केलंय. शाळेत आपल्या पाल्यांना पाठवण्यासाठी पालकांनी आपले संमतीपत्र देणे आवश्यक आहे.

शाळांसमोरील अडचणी नेमक्या काय?

महापालिकेच्या आदेशानुसार शाळा व्यवस्थापनाची वर्ग सुरु करण्याची तयारी आहे. मात्र, विद्यार्थ्यांना दोन बॅचेसमध्ये शाळेत बोलवावं लागणार आहे.तर, काही ठिकाणी ओमिक्रॉनच्या धसक्यानं विद्यार्थ्यांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नसल्याच चित्र आहे. काही पालक अजूनही ऑनलाईन क्लासेस सुरु ठेवण्याच्या मानसिकतेमध्ये असल्याची काही शाळाप्रमुखांनी सांगितलं आहे. कमी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये शाळा सुरु केल्यास स्कुल बसचा खर्च देखील वाढत असल्याचं सांगण्यत आलंय. काही पालकांनी शाळा नव्या वर्षात सुरु करावी, अशी भूमिका घेतलीय.

इतर बातम्या:

VIDEO | ‘माझी वसुंधरा अभ्यासक्रम’ शालेय शिक्षण मंत्र्यांकडे सुपूर्द, विद्यार्थ्याला पर्यावरणाविषयी जबाबदार नागरिक बनविणार

Nashik School Reopen : नाशिकच्या प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट, प्रशासनाची जय्यत तयारी

Mumbai School Reopen BMC Education Officer Raju Tadvi said direction sent to schools to reopen from 15 December