मुंबई: मुंबई विद्यापीठानं (Mumbai University) काल, बुधवारी पदवी प्रवेशाची (FY Entrance) पहिली गुणवत्ता यादी जाहीर केलीये. केंद्रीय मंडळांच्या बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच मुंबई विद्यापीठाने ही यादी जाहीर केलीये. गेल्या वर्षी वाढलेला कटऑफ यंदा खाली आला आहे. सायन्स शाखेच्या कटऑफमध्ये मोठी घट यंदा झाली असून त्याखालोखाल कॉमर्स आणि आर्ट्सचा कटऑफही (Cut-Off) खाली आला आहे. कॉमर्स शाखेतील व्यावसायिक अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची पसंती आहे. आर्ट्स आणि सायन्सला तितकीशी विद्यार्थ्यांची पसंती नाही. गेल्या वर्षी कोरोनामुळे अंतर्गत मूल्यमापनाआधारे बारावीचा निकाल लागल्याने त्याचा परिणाम एफवायच्या कटऑफवर झाल्याचं दिसून येतंय. कटऑफमध्ये यंदा 2 ते 10 टक्क्यांपर्यंत मोठी घट झालीये.