National Achievement Survey: देशभरातील 3.4 दशलक्ष विद्यार्थी सर्व्हेत सहभागी! विद्यार्थी म्हणतात,”डिजिटल माध्यमांची बोंब, अजूनही शाळेत पायीच जावं लागतं”

| Updated on: May 27, 2022 | 12:33 PM

शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने बुधवारी सायंकाळी नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे 2021 चा अहवाल प्रसिद्ध केला, ज्यामध्ये देशभरातील इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीमधील विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या क्षमतेचे सर्वसमावेशक सर्वेक्षण करण्यात आले. त्याचबरोबर देशातील शालेय शिक्षण व्यवस्थेच्या आरोग्याचाही आढावा घेण्यात आला आहे

National Achievement Survey: देशभरातील 3.4 दशलक्ष विद्यार्थी सर्व्हेत सहभागी! विद्यार्थी म्हणतात,डिजिटल माध्यमांची बोंब, अजूनही शाळेत पायीच जावं लागतं
विद्यार्थी म्हणतात,"डिजिटल माध्यमांची बोंब, अजूनही शाळेत पायीच जावं लागतं"
Image Credit source: HuffPost India
Follow us on

नवी दिल्ली: नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे 2021 (National Achievement Survey 2021) मध्ये सहभागी झालेल्या भारतभरातील 3.4 दशलक्ष विद्यार्थ्यांपैकी 38 टक्के विद्यार्थ्यांचा असं म्हणणं आहे की महामारीच्या काळात त्यांना शिक्षण सुरू ठेवणे अत्यंत कठीण होते. त्याचबरोबर जवळपास 24 टक्के विद्यार्थ्यांनी सांगितलं की, महामारीच्या काळात ऑनलाईन अभ्यास (Online Education) करण्यासाठी त्यांच्याकडे कोणतंही डिजिटल माध्यम नव्हतं. या सर्वेक्षणानुसार, सुमारे 80 टक्के विद्यार्थ्यांना असे वाटतं की, शिक्षकांच्या मदतीने (With The Help Of Teachers) आपण शाळेत गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे शिकू शकलो असतो. या सर्वेक्षणात तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे 2021 मध्ये भाषा, गणित, पर्यावरण विज्ञान, सामाजिक विज्ञान आणि इंग्रजी विषय अशा विविध विषयांवर सर्वेक्षण करण्यात आले. देशभरात विद्यार्थी जसेजसे पुढच्या वर्गात जात आहेत तसेतसे त्यांच्या शिकण्याची क्षमता कमी होत असल्याचे या पाहणीत आढळून आले आहे. भारतातील सुमारे 48 टक्के विद्यार्थी आजही पायीच शाळेत जातात, असेही या पाहणीत स्पष्ट झाले आहे.

शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने बुधवारी सायंकाळी नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे 2021 चा अहवाल प्रसिद्ध केला, ज्यामध्ये देशभरातील इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीमधील विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या क्षमतेचे सर्वसमावेशक सर्वेक्षण करण्यात आले. त्याचबरोबर देशातील शालेय शिक्षण व्यवस्थेच्या आरोग्याचाही आढावा घेण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांतील ‘नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे’मध्ये शालेय शिक्षण पद्धतीचे एकूण मूल्यमापन दिसून येते. 2017 मध्ये नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे करण्याची शेवटची वेळ होती.

हे सुद्धा वाचा

या अहवालानुसार, उच्च वर्गात गेल्यानंतर राष्ट्रीय स्तरावर 500 च्या स्केल स्कोअरमध्ये विद्यार्थ्यांची सरासरी कामगिरी कमी होऊ लागते
उदाहरणार्थ,

  • इयत्ता तिसरी – भाषेतील राष्ट्रीय सरासरी कामगिरी 500 पैकी 323 – दहावीत 500 पैकी 260
  • इयत्ता तिसरी – गणित राष्ट्रीय सरासरी गुण 500 पैकी 306 – इयत्ता 5 वीमध्ये 500 पैकी 284

12 नोव्हेंबर 2021 रोजी देशभरात नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे 2021 घेण्यात आला होता. यात केंद्र व राज्य सरकारच्या शाळा, अनुदानित शाळा आणि विनाअनुदानित खासगी शाळांचा समावेश होता. या सर्वेक्षणात 5,26,824 शिक्षकांचा समावेश होता, ज्यात 1,18,274 शाळांमधील 34,01,158 विद्यार्थ्यांचा समावेश होता.

नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे 2021 अंतर्गत राज्यनिहाय कामगिरी देखील सादर केली गेली आहे, जिथे बहुतेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची कामगिरी एकूण राष्ट्रीय स्कोअरपेक्षा कमी होती. पंजाब, केरळ, राजस्थान, महाराष्ट्र आणि चंदीगड सारख्या केंद्रशासित प्रदेशांनी राष्ट्रीय सरासरीपेक्षा चांगले गुण मिळवले आहेत. दादरा आणि नगर हवेलीसारखे केंद्रशासित प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश आणि तेलंगणासारख्या राज्यांचा या सर्वेक्षणात सर्वात कमी कामगिरी करणाऱ्या राज्यांच्या यादीत समावेश आहे.