नवी दिल्ली: भारतात राष्ट्रीय शिक्षण दिन हा 11 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षण दिन 11 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या भारतीय शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. राष्ट्रीय शिक्षण दिन 2008 पासून दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो.
मौलाना अबुल कलाम आझाद हे स्वातंत्र्यानंतरचे देशाचे पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री होते. अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त देशात राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करण्यात येतो. कलाम यांनी 1947 ते 1958 या काळात त्यांनी स्वतंत्र भारताचे शिक्षण मंत्री म्हणून काम केले.
मौलाना अबुल कलाम आझाद यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात देखील महत्त्वाचं योगदान दिलं आहे. शिक्षणतज्ञ, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी म्हणून त्यांनी काम केलं.भारताची शैक्षणिक संरचना सुधारण्यासाठी अबुल कलाम आझाद यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आपली स्वप्ने विचारांमध्ये बदलतात आणि विचारांचे परिणाम कृतीत होतात, असं अबुल कलाम आझाद म्हणायचे. कलाम यांनी देशातील शैक्षणिक स्थिती सुधारण्याचं स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
मौलाना अबुल कलाम आझाद यांचं शिक्षण क्षेत्रातील योगदान लक्षात घेता तत्कालीन मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.भारताच्या या महान सुपुत्राच्या भारतातील शिक्षणासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करून त्यांची जयंती दरवर्षी 11 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण म्हणून साजरा केला जाईल, असं मंत्रालयानं म्हटलं होतं.
राष्ट्राच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी शिक्षण हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे, असं मौलाना अबुल कलाम आझाद म्हणाले होते. ते शिक्षणमंत्री असताना भारतातील पहिली भारतीय तंत्रज्ञान संस्था, आयआयटी खरगपूर, स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर, पहिली भारतीय विज्ञान संस्था यासारख्या अनेक महत्त्वाच्या संस्थांची स्थापना करण्यात आली.
मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म 1888 मध्ये सौदी अरेबियातील मक्का येथे झाला. विद्यार्थ्यांनी सर्जनशील असावे आणि वेगळा विचार केला पाहिजे असा त्यांचा नेहमीच आग्रह असे. “शिक्षणतज्ज्ञांनी विद्यार्थ्यांमध्ये चौकस दृष्टिकोन, सर्जनशीलता, उद्योजकता आणि नैतिक नेतृत्वाची क्षमता निर्माण केली पाहिजे आणि त्यांचा आदर्श बनवलं पाहिजे.”, असं म्हटलं होतं.
स्त्री शिक्षणाचे समर्थक
मौलाना अबुल कलाम आझाद यांनी महिलांचे सक्षमीकरण ही राष्ट्राच्या सुधारणेसाठी आवश्यक आणि महत्त्वपूर्ण अट आहे, असे विचार मांडले होते. महिलांच्या सक्षमीकरणानेच समाज स्थिर होईल, असा त्यांचा विश्वास होता. 1949 मध्ये त्यांनी संविधान सभेत महिलांच्या शिक्षणाचा मुद्दा मांडला होता. कलाम यांनी ग्रामीण उच्च शिक्षण मंडळ, नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर बेसिक एज्युकेशन आणि इतर संस्थांचीही पायाभरणी केली. कलाम यांचे भारताच्या शैक्षणिक क्षेत्राच्या विकासातील योगदान सर्वांसाठी निश्चितचं प्रेरणादायी आहे.
Remembering Maulana #AbulKalamAzad on his birth anniversary. He argued that education was a matter of grave importance and the central government should be given this authority in order to ensure a uniform national standard of education across the country.#NationalEducationDay pic.twitter.com/Ev1iojRvaL
— Sashmita Behera (@incsashmita) November 11, 2021
इतर बातम्या:
गुजरातेतल्या द्वारकेत 350 कोटींचं ड्रग्ज पकडलं, आधी संजय राऊत, आता मलिकांनी भाजपला घेरलं?
National Education Day 2021 is celebrated on November 11 for tribute to Maulana Abul Kalam Azad know about him