NBE Exam Schedule : एनबीईकडून वर्षातील परीक्षांचं वेळापत्रक जारी, NEET पीजी परीक्षा ‘या’ दिवशी

| Updated on: Jul 27, 2021 | 6:40 PM

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सने (NBEMS) जुलै,2021 ते मार्च 2022 दरम्यानच्या विविध वैद्यकीय परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे.

NBE Exam Schedule : एनबीईकडून वर्षातील परीक्षांचं वेळापत्रक जारी, NEET पीजी परीक्षा या दिवशी
exam
Follow us on

नवी दिल्ली: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सने (NBEMS) जुलै,2021 ते मार्च 2022 दरम्यानच्या विविध वैद्यकीय परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे. नीट पीजी परीक्षा 2021 ही 11 सप्टेंबर रोजी आयोजित केली जाणार आहे. एनबीईच्या वतीनं , नीट सुपरस्पेशालिटी (एसएस) 2021 परीक्षा 13 आणि 14 नोव्हेंबर रोजी आणि नीट एमडीएस 2022 परीक्षा 19 डिसेंबर होईल, असं सांगण्यात आलं आहे. डीएनबी-पीडीसीईटी 2021 परीक्षा 19 सप्टेंबर आणि एफईटी 2021 परीक्षा 20 नोव्हेंबरला होणार आहे.

अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन

फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट परीक्षा (एफएमजीई) डिसेंबर 2021 सत्र आणि फॉरेन डेंटल स्क्रीनिंग टेस्ट 2021 या दोन्ही परीक्षा 12 डिसेंबर रोजी आयोजित केल्या जाणार आहेत. फेलोशिप प्रवेश परीक्षा (एफईटी) 20 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे.

एनबीईने एक नोटिफिकेशन करुन हे वेळापत्रक तात्पुरत्या स्वरुपाचं असून त्यामध्ये बदल होऊ शकतात, असं सांगितलं आहे. उमेदवारांनी पुढील काळात परीक्षांच्या अचूक तारखांसाठी आणि इतर माहितीसाठी natboard.edu.in आणि nbe.edu.in या वेबसाईटला भेट द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

नॅशनल बोर्ड ऑफ एज्युकेशनचं परीक्षांचं वेळापत्रक

नीट पदुव्यत्तर परीक्षा सप्टेंबरमध्ये

नीट पोस्ट ग्रॅज्युएशनची तारीख (NEET PG Exam date 2021) जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मंडावीया यांनी ट्विट करून परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. आरोग्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, आता एनईईटी पीजी परीक्षा (NEET PG Exam date 2021) 11 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहे.

ही परीक्षा देशातील 6,102 सरकारी, खासगी, अभिमत आणि केंद्रीय विद्यापीठांमधील प्रवेशांसाठी आयोजित केली जाणार आहे. NEET PG 2021 परीक्षा केंद्रांविषयी माहिती अ‌ॅडमिट कार्डवर दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी अ‌ॅडमिट कार्ड डाऊनलोड करुन परीक्षा केंद्रांवर कसे पोहोचायचे या विषयी माहिती मिळवावी.

NEET PG 2021 Admit Card डाऊनलोड कसे करायचे?

स्टेप 1: विद्यार्थ्यांनी एनबीईची ऑफिशियल वेबसाईट nbe.ed.u.in वर भेट द्यावी.
स्टेप 2: वेबसाईट वर दिलेल्या “NEET PG 2021 Admit Card” लिंक वर क्लिक करा.
स्टेप 3: युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा.
स्टेप 4: तुम्हाला तुमचे अ‌ॅडमिट कार्ड उपलब्ध होईल.
स्टेप 5: अ‌ॅडमिट कार्ड डाऊनलोड करुन त्याची प्रिंट काढून ठेवा.

इतर बातम्या:

NEET PG 2021 Admit Card: नीट पीजी परीक्षेचे ॲडमिट कार्ड जाहीर होणार, डाऊनलोड करण्याच्या सोप्या टिप्स

Board Exam 2021: बोर्ड परीक्षा रद्द करा, विद्यार्थ्यांच्या मागणीला सोनू सूदचा पाठिंबा, सरकारला सांगितला ‘हा’ उपाय

NBE Releases Schedule For 2021 22 Medical Exams check details know information about NEET PG exam