NCHM JEE Result 2022: NCHM JEE चा निकाल लागला! nchmjee.nta.nic.in वर जाऊन चेक करा निकाल

| Updated on: Jul 09, 2022 | 12:56 PM

NCHM JEE Result 2022: हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेत बसलेले उमेदवार आता NTA च्या अधिकृत वेबसाइट nchmjee.nta.nic.in वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात.

NCHM JEE Result 2022: NCHM JEE चा निकाल लागला! nchmjee.nta.nic.in वर जाऊन चेक करा निकाल
NCHM JEE Results 2022
Image Credit source: Official Website
Follow us on

NCHM JEE Result 2022: हॉटेल मॅनेजमेंट (Hotel Management) कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाणारी प्रवेश परीक्षा म्हणजेच NCHM JEE 2022 18 जून रोजी घेण्यात आली. उमेदवार आता NTA nchmjee.nta.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट, संयुक्त प्रवेश परीक्षा (NCHM JEE) 2022, NCHM JEE निकाल 2022 जाहीर केला आहे. हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेत बसलेले उमेदवार आता NTA च्या अधिकृत वेबसाइट nchmjee.nta.nic.in वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. हॉटेल मॅनेजमेंट कोर्सला प्रवेश घेण्यासाठी NCHM जेईई 2022 ची परीक्षा 18 जून 2022 रोजी झाली. गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवार आपल्या निकालाची वाट पाहत आहेत. आता आज हा निकाल लागेलला आहे आणि उमेदवार त्यांचे स्कोअर कार्ड डाउनलोड करू शकतात.

NCHM JEE निकाल 2022 स्कोअर कार्ड कसं डाउनलोड कराल?

  1. सर्वप्रथम NTA च्या नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंटची अधिकृत वेबसाईट nchmjee.nta.nic.in वर जा.
  2. मुख्यपृष्ठावर, “NCHM JEE-2022 साठी स्कोअर कार्ड” यावर क्लिक करा
  3. आता तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
  4. स्क्रीनवर NCHM JEE-2022 चा निकाल दिसेल.
  5. ते तपासा आणि स्कोअरकार्ड डाउनलोड करा.
  6. उमेदवार पुढील संदर्भासाठी त्यांच्या निकालाची प्रिंट काढून घेऊ शकतात.

NCHM JEE निकाल 2022 स्कोअर कार्ड डाउनलोड लिंक

NCHMCT JEE 2022 च्या निकालानंतर काय ?

परीक्षेत निवडलेल्या उमेदवारांना समुपदेशन प्रक्रियेसाठी उपस्थित राहावे लागेल. NTA लवकरच समुपदेशनाचे वेळापत्रक जाहीर करेल. निवडलेल्या उमेदवारांना जागा वाटप NCHMCT JEE 2022 आणि PI च्या लेखी परीक्षेतील त्यांच्या कामगिरीच्या आधारावर केले जाईल. एनसीएचएमसीटी जेईई परीक्षेतील प्रश्नपत्रिकेत पाच विभाग होते. उत्तर देण्यासाठी उमेदवारांना 150 मिनिटे दिली होती.परिमाणात्मक क्षमता, इंग्रजी आकलन, सामान्य ज्ञान, तर्क आणि सेवा उद्योगासाठी योग्यता या विभागांमधून प्रश्न विचारले गेले ते आहेत. परीक्षेत प्रत्येकी चार गुणांचे एकूण 200 प्रश्न होते. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग – 1 मार्क होते.