नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नीट पीजी (NEET PG Exam) परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नीट पीजी परीक्षेतील कट ऑफ 15 पर्सेंटाईलनं (NEET PG Exam Cut Off) कमी कऱण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळं हजारो विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. केंद्रीय आरोग्य सेवांचे संचालक यांनी यासंदर्भात नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनला (NBE) मोठे आदेश दिले आहेत. त्यामुळं नीट पीजी परीक्षेत पात्र ठरण्यासाठी विद्यार्थ्यांनी 50 टक्के पर्सेंटालईची गरज असणार नाही. नीट पीजी परीक्षा 2021चा सुधारित निकाल जाहीर करण्याचे आदेश एनबीई ला देण्यात आले आहेत. एनबीईकडून लवकरचं सुधारित निकाल जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. नव्या निर्णयामुळं खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नीट पीजीमध्ये पात्र ठरण्यासाठी 35 पर्सेंटाईल मिळवणं आवश्यक असणार आहे.
In a letter to the National Board of Examinations (NBE) regarding NEET -PG 2021, the Directorate General Of Health Services said, “to reduce the cut off by 15 percentile across all categories…kindly declare the revised result…” pic.twitter.com/QFYduDlxsO
— ANI (@ANI) March 12, 2022
नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनकडून नीट पीजी परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल जारी करताना खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी पात्र ठरण्यासाठी त्यांना 35 पर्सेंटाईल गुण मिळवणं आवश्यक असेल. तर, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 30 पर्सेंटाईल गुणं मिळवणं आवश्यक आहे. एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नीट पीजी उत्तीर्ण व्हायचं असेल तर त्यांनी 25 पर्सेंटाईल गुण मिळवणं आवश्यक असेल.
नीट पीजी परीक्षेच्या कट ऑफ सुधारणा करण्यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालय, नॅशनल मेडिकल कॉऊन्सिल यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेण्यात आला आहे. या सर्वांशी चर्चा करुन नीट पीजी परीक्षेच्या कट ऑफमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनकडून आता सुधारित निकाल लवकरच जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. सुधारित निकाल हा नव्यानं जारी करण्यात आलेल्या कट ऑफनुसार असेल या मुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नीट पीजी परीक्षा 2022 साठी कमला वयोमर्यादा हटवण्यात आली होती.
केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवारांचा साधेपणा; नाशिकमध्ये चालवले गुऱ्हाळ, पंचक्रोशीत चर्चेचा गोडवा!
Pimpri-chinchwad crime| पिंपरीत खासगी सावकाराचा प्रताप 60 टक्के व्याजदराने आकार होता व्याज