नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency) एनईईटी यूजी (NEET UG) परीक्षेसाठी जाहीर केले आहे की, सीयूईटी यूजीची पहिली परीक्षा 15 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. एनटीएने ही तारीख जाहीर केल्यापासून विद्यार्थी नीट यूजी परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आहेत. 17 जुलै रोजी होणाऱ्या नीट यूजी परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की, या तारखेच्या आसपास अनेक महत्त्वाच्या परीक्षा आहेत, त्यामुळे त्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळत नाहीये. आता यूजी नीटच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करण्यासाठी ट्विट #postponeneetug2022 (#postponeneetug2022) करून आपला आवाज आणखी तीव्र केलाय आहे. एकप्रकारे विद्यार्थी ऑनलाइन आंदोलनच करत आहेत.
नीट यूजीचे विद्यार्थी सोशल मीडियावर आवाज उठवत आहेत. #postponeneetug2022 विद्यार्थ्यांकडून ट्विटरवर ट्रेंड होत आहे. आतापर्यंत 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ट्विट केलं आहे. एका ट्विटर यूजरने लिहिले की, नीट यूजीच्या उमेदवारांनी ऑनलाइन माध्यमातून आदराने शांततेत विरोध केला आहे. विद्यार्थ्यांच्या या विरोधाला प्रतिसाद मिळेल का? यावर सुनावणी होईल का? असा प्रश्न युजरने उपस्थित केलाय. ट्विटरवर विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स येत आहेत.
As we all know cuet exam is so close to neet exam. Neet exam should be postponed or students may suffer pressure.#postponeneetug2022 #PostponeNEETUG @DG_NTA @DG_NTA #NEETUG2022
— Piyush Sharma (@Piyushs8689) June 25, 2022
CUET in July
NEET in July
JEE in July
I am confused, are we students or puppets??@PMOIndia @dpradhanbjp
Please sir don’t ruin our mental state. Can’t handle this stress anymore#JUSTICEforNEET #Darmendrapradhanhelpus #PostponeNEETUG
Please postpone NEET till September ??— Savleen Kaur (@kaursavleen1717) June 25, 2022
झालंय असं की नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 2022 या वर्षासाठी जुलै 2022 मध्ये अनेक मोठ्या स्पर्धा परीक्षांच्या तारखा निश्चित केल्यात. या परीक्षांमध्ये जेईई मेन 2022 सत्र परीक्षा 21 जुलै ते 3 जुलै दरम्यान होणार आहे. त्याचबरोबर नवीनच सुरु झालेली राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा CUET 2022 ही परीक्षाही याच काळात होणार आहे. बऱ्याच परीक्षा एकाच काळात होतायत. 17 जुलैला यूजी नीट 2022 परीक्षेचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय आणि त्याच वेळी, त्या दरम्यान सीयूईटी घेण्यात येणारे. त्यामुळे विद्यार्थ्यांना यूजी नीट 2022 परीक्षा पुढे ढकलून हवीये.
एकाच वेळी अनेक महत्त्वाच्या परीक्षांमुळे आम्हाला तयारीसाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. एनईईटी यूजी हे आमचे भविष्य आहे, आमचे करिअरचे स्वप्न आहे. आम्हाला आमचं वर्ष वाया घालवायचं नाहीये. त्यामुळे ही परीक्षा काही दिवस पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थी ट्विटरवर करतायत.
नीट यूजी परीक्षा दरवर्षी घेतली जाते. या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस, बीडीएस, आयुष पदवी, बीएस्सी नर्सिंग, बीएस्सी लाइफ सायन्सेस आणि व्हेटर्नरी मेडिसीन या पदवीपूर्व अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट पीजी परीक्षा घेतली जाते.