NEET PG Counselling
Image Credit source: Social Media
NEET UG 2022 Exam: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) आज म्हणजे 17 जुलै 2022 रोजी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा – पदवी (NEET UG Exam 2022) आयोजित करणार आहे. अधिकृत वेळापत्रकानुसार, नीट यूजी 2022 आज दुपारी 2:00 ते 5:20 या वेळेत आयोजित केली जाईल. देशातील 497 शहरांसह भारताबाहेरील 14 शहरांमधील विविध नीट परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी परीक्षेच्या तयारीत गुंतलेले असतात, त्यामुळे ते काही आवश्यक वस्तू किंवा कागदपत्रे परीक्षा केंद्रावर घेऊन जाण्यास विसरतात आणि त्यामुळे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो, असे दिसून आले आहे. म्हणून इथे आम्ही सर्व आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे आणि शेवटच्या क्षणी काही सूचनांचा उल्लेख करीत आहोत जेणेकरून विद्यार्थी एनईईटी परीक्षा केंद्रांवर (NEET Exam Center) पोहोचण्यापूर्वी काहीही घेऊन जाण्यास विसरू नये.
NEET UG 2022: जाणून घ्या कोणत्या गोष्टी घेऊन जाण्याची परवानगी
- विद्यार्थ्यांना पाण्याची बाटली सोबत आणण्याची मुभा आहे, ती पारदर्शक असावी.
- विद्यार्थी सोबत ५० मिलीची हँड सॅनिटायझरची बाटली ठेवू शकतात.
- विद्यार्थ्यांनी नीट प्रवेशपत्र, सेल्फ डिक्लरेशन फॉर्म आणि अंडरटेकिंग फॉर्म सोबत बाळगणे बंधनकारक आहे.
- विद्यार्थ्यांनी पासपोर्ट साइजचे दोन फोटो सोबत ठेवणे आवश्यक आहे, त्यातील एक फोटो हजेरी पत्रकावर लावण्यात येईल.
- परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांनी निळ्या किंवा काळ्या रंगाचे बॉलपॉइंट पेन सोबत बाळगणे आवश्यक आहे.
NEET UG 2022: जाणून घ्या कोणत्या गोष्टी नेण्याची परवानगी नाही
- ब्लूटूथ, मोबाइल, कॅल्क्युलेटर, मायक्रोफोन, स्मार्ट वॉच आदी कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स परीक्षा केंद्रावर घेऊन जाण्याची मुभा विद्यार्थ्यांना नाही.
- परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्यांना कोणतेही खाद्यपदार्थ सोबत घेऊन जाता येत नाही.
- परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे दागिने घालण्याची परवानगी नाही.
- प्रवेशपत्राशिवाय इतर कोणतीही कागदपत्रे परीक्षा हॉलमध्ये नेण्यास परवानगी दिली जाणार नाही.
- भारतातील अव्वल वैद्यकीय महाविद्यालये, विद्यापीठे किंवा संस्थांमध्ये एमबीबीएस किंवा बीडीएस अभ्यासक्रमाच्या जागा निश्चित करण्यासाठी नीट यूजी 2022 ची परीक्षा 18 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी देणे अपेक्षित आहे.
परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी नीट ॲडमिट कार्ड 2022, पासपोर्ट साईज फोटोग्राफ आणि पेन ही सर्व आवश्यक कागदपत्रं घेतली आहेत की नाही हे तपासून पाहावे. याशिवाय शेवटच्या क्षणी होणारा त्रास टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा केंद्रावर 2 तास आधी पोहोचावे.