मुंबई: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच नीट यूजी 2023 चा निकाल जाहीर करू शकते. ही परीक्षा 2023 जून 7 रोजी घेण्यात आली होती. तात्पुरती उत्तरपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली असून त्यावर हरकती नोंदविण्यासाठी उमेदवारांना 6 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता एनटीए नीट यूजी 2023 ची अंतिम उत्तर-की आणि निकाल कधीही जाहीर करू शकते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नीट यूजी निकाल 2023 जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाऊ शकतो. तर अनेक अहवालांमध्ये आज, 9 जून रोजी निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तथापि, एनटीएने निकाल जाहीर करण्यासाठी कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. नीट यूजी निकाल neet.nta.nic.in अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला जाईल. निकाल जाहीर झाल्यानंतर समुपदेशनाचे वेळापत्रक जाहीर केले जाईल.
एकूण 97.7 टक्के विद्यार्थी परीक्षेला बसले होते. भारताबाहेरील 14 शहरांसह देशभरातील 4097 विविध केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. 15 टक्के प्रवेश अखिल भारतीय कोट्यातील जागांवर तर उर्वरित 85 टक्के जागा राज्य कोट्यातून भरल्या जाणार आहेत.
NTA ऑल इंडिया रँक जारी करेल. समुपदेशनासाठी अर्ज करताना जाहीर केलेल्या संबंधित प्रवर्गातील अखिल भारतीय रँकच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
हा अपेक्षित कट ऑफ आहे. उमेदवारांनी याला अंतिम कट ऑफ समजू नये. निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवर्गनिहाय अंतिम कट ऑफ यादी जाहीर केली जाईल.