मुंबई: वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षी नीट यूजी परीक्षेला बसलेले विद्यार्थी आता आपला निकाल पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी एनटीएच्या neet.nta.nic.in अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. निकाल पाहण्यासाठी नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख आवश्यक आहे. नीट यूजी परीक्षा 7 मे 2023 रोजी जाहीर करण्यात आली होती. या परीक्षेच्या प्रोविजनल (तात्पुरत्या) उत्तरपत्रिका 4 जून 2023 रोजी जाहीर करण्यात आल्या होत्या. 6 जूनपर्यंत विद्यार्थ्यांसाठी या उत्तरपत्रिकेवर आक्षेप घेण्याचा पर्याय होता. उत्तरपत्रिकांच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला आहे.
NTA कडून जारी झालेल्या माहितीनुसार सर्वात जास्त पात्र उमेदवार उत्तर प्रदेशचे आहेत, त्यानंतर महाराष्ट्र आणि राजस्थानचा क्रमांक लागतो. तामिळनाडूचा प्रबंजन जे आणि आंध्र प्रदेशचा बोरा वरुण चक्रवर्ती यांनी नीट परीक्षेत 99.99 टक्के मिळवून अव्वल क्रमांक पटकावला आहे.