नवी दिल्ली: राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट यूजी 2021 परीक्षा 12 सप्टेंबरला म्हणजेच आज आयोजित केली जात आहे. नीट यूजी परीक्षेचं आयोजन देशभरातील आणि परदेशातील 202 शहरातील केंद्रावर होत आहे. परीक्षेसाठी 13.66 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परिक्षेचं आयोजन दुपारी 2 ते 5 च्या दरम्यान केलं जाणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं परीक्षेला उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर येताना कोणत्या गोष्टी आणाव्यात, कोणत्या नाही यासंदर्भात माहिती दिली आहे.
NEET 2021 परीक्षेसाठी सुमारे 13.66 लाख उमेदवारांनी नोंदणी केली आहे. यासाठी उपस्थित होणाऱ्या सर्व उमेदवारांना काही मार्गदर्शक तत्त्वे आणि ड्रेस कोडचे पालन करावे लागेल. NEET 2021 साठी ड्रेस कोड NTA ने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, लांब बाही असलेले हलके कपडे घालण्यास परवानगी नाही. तथापि, जर उमेदवार सांस्कृतिक पोशाखात परीक्षा केंद्रावर आले तर त्यांनी शेवटच्या रिपोर्टिंग वेळेच्या किमान एक तास आधी म्हणजे दुपारी 12:30 वाजता अहवाल द्यावा, अशा सूचना देण्यात आल्यात. उमेदवारांना शूज घालण्याचीही परवानगी नाही. मात्र चप्पल आणि सँडलला उंच टाचांसह परवानगी आहे.
नीट परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी 2 तास म्हणजेच 12 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहायला सांगण्यात आलं आहे. परीक्षा केंद्रावर प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना N-95 मास्क दिला जाणार आहे. परीक्षा केंद्रात सॅनिटायझर नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना स्वंयघोषणापत्र देखील जमा करावं लागणार आहे.
गेल्या वर्षी कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करीत 13 सप्टेंबर रोजी नीट परीक्षा घेण्यात आली. परीक्षेला एकूण 13.66 लाख उमेदवार परीक्षेला बसले होते, त्यापैकी 7,71,500 विद्यार्थी पात्र ठरले होते. यावर्षी ही परीक्षा इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, ओडिया, तामिळ, तेलगू आणि उर्दू या 11 भाषांमध्ये घेण्यात येणार आहे.
या परीक्षेबरोबरच विद्यार्थ्यांना नीट युजी परीक्षेसाठी परीक्षा केंद्रे उपलब्ध करुन दिली जातील. कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याबरोबरच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना मास्क वाटप करण्यात येणार आहे. यासह विद्यार्थ्यांच्या येण्या-जाण्याचा स्लॉटही ठरविला जाईल. तसेच, सर्व प्रकारच्या नोंदणी शारीरिक संपर्काशिवाय असतील. फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासाठी संपूर्ण खबरदारी घेतली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
इतर बातम्या:
हेही पाहा:
Neet ug exam 2021 will start today at 2 pm know about exam centres rules and corona guidelines neet exam dress code