सुप्रीम कोर्टानं मुंबई हायकोर्टाचा निर्णय बदलत नीट यूजी परीक्षेचा निकाल (NEET UG Result 2021) जाहीर करण्यावरील स्थगिती उठवली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळं नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात आलेल्या पदवीस्तरावरील राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षेच्या निकालाची उत्सुकता विद्यार्थ्यांना लागून राहिलेली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी आज किंवा उद्या निकाल जाहीर करू शकते, अशी सूत्रांची माहिती आहे. 12 सप्टेंबरला झालेल्या नीट यूजी परीक्षेला 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 16 लाख विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. विद्यार्थी अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in ला भेट देऊन निकाल पाहू शकतात.
विद्यार्थ्यांना नीट परीक्षेचा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या neet.nta.nic.in या वेबसाईटवर निकाल पाहायला मिळेल. इतर कोणत्याही वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल उपलब्ध होणार नाही.
सुप्रीम कोर्टानं मुंबई हायकोर्टाचा निर्णय बदलत नीट यूजी परीक्षेचा निकाल (NEET UG Result 2021) जाहीर करण्यावरील स्थगिती उठवली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळं नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात आलेल्या पदवीस्तरावरील राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षेच्या निकालाचा मार्ग मोकळा झाला आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून 12 सप्टेंबर रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर नीट यूजी परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. नीट यूजी परीक्षेसाठी तब्बल 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, लवकरच निकाल जाहीर होणार असल्यानं 16 लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार आहे.
एनटीएकडून जाहीर करण्यात आलेल्या निकालासंदर्भात विद्यार्थी असमाधानी असल्यास किंवा निकालात काही त्रुटी आढळल्यास, उमेदवार NTA शी ईमेल id- nta@neet.ac.in वर संपर्क साधू शकतात.
स्टेप 1 : अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in ला भेट द्या.
स्टेप 2 : होमपेजवरील निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3 : तुमचा रोल नंबर, पासवर्ड आणि जन्मतारीख नोंदवा.
स्टेप 4 : स्कोअरकार्ड स्क्रीनवर दिसेल, ते डाऊनलोड करा.
स्टेप 5 : तसेच निकालाची प्रिंट आऊट आपल्याकडे ठेवा.