NEET UG Result 2021: नीट यूजी परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार, रिझल्ट कुठं पाहणार?

| Updated on: Oct 24, 2021 | 1:13 PM

नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात आलेल्या पदवीस्तरावरील राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षेच्या निकालाची उत्सुकता विद्यार्थ्यांना लागून राहिलेली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नॅशनल टेस्टिंग एजन्सी 30 ऑक्टोबरपर्यंत निकाल जाहीर करू शकते.

NEET UG Result 2021: नीट यूजी परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार, रिझल्ट  कुठं पाहणार?
EXAM
Follow us on

NEET UG Result 2021 नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात आलेल्या पदवीस्तरावरील राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षेच्या निकालाची उत्सुकता विद्यार्थ्यांना लागून राहिलेली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नॅशनल टेस्टिंग एजन्सी 30 ऑक्टोबरपर्यंत निकाल जाहीर करू शकते. मात्र, यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.NTA एकाच वेळी परीक्षेची उत्तरतालिका आणि निकाल जाहीर करू शकते. या परीक्षेत जास्तीत जास्त टक्केवारी मिळवून उमेदवारांना चांगली रँक मिळणं आवश्यक आहे. कारण त्यांना या रँकिंगच्या आधारे कॉलेज मिळतील. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी उमेदवारांना किमान NEET 2021 कट-ऑफ टक्केवारी आणि गुण मिळवणे आवश्यक आहे. NEET निकालासह कट ऑफ जाहीर केला जाईल.

NEET 2021 निकाल कसा पाहायचा

स्टेप 1 : अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in ला भेट द्या.
स्टेप 2 : होमपेजवरील निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3 : तुमचा रोल नंबर, पासवर्ड आणि जन्मतारीख टाका.
स्टेप 4 : स्कोअरकार्ड स्क्रीनवर दिसेल, ते डाऊनलोड करा.
स्टेप 5 : तसेच निकालाची प्रिंट आऊट आपल्याकडे ठेवा.

निकालात त्रुटी असल्यास कुठं संपर्क साधायचा?

गेल्या वर्षी, NEET कटऑफ स्कोअर सामान्य श्रेणीसाठी 720-147 होता जो 50 व्या पर्सेंटाइलच्या समकक्ष होता. एससी/एसटी/ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी, NEET कटऑफ स्कोअर 146-113 च्या श्रेणीत होता, जो 40 व्या पर्सेंटाईलच्या समकक्ष होता. निकालात काही त्रुटी आढळल्यास, उमेदवार NTA शी ईमेल id- nta@neet.ac.in वर संपर्क साधू शकतात.

NEET UG फेज 2 ची नोंदणी सुरु

NTA ने दुसऱ्या टप्प्यातील अर्ज प्रक्रिया आणि अर्जातील सुधारणा विंडो पुन्हा उघडली आहे. नवीन सूचनेनुसार, उमेदवार आता 26 ऑक्टोबर रोजी रात्री 11:50 पर्यंत NEET UG फेज 2 नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

NTA ने NEET 2021 अर्जाच्या फॉर्मचे दोन भाग केले आहेत: फेज 1 आणि फेज 2. अर्जाचा पहिला भाग उमेदवारांनी परीक्षेपूर्वी भरायचा होता आणि दुसरा टप्पा म्हणजेच दुसरा भाग निकाल घोषित करण्यापूर्वी भरायचा होता. नोंदणीचा दुसरा टप्पा संपल्यानंतर म्हणजेच 26 ऑक्टोबर नंतरच निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी एनटीए नीट परीक्षेच्या वेबसाईटला भेट द्यावी.

इतर बातम्या:

पिंपळगावच्या कांदा व्यापाऱ्यांकडे सापडले 100 कोटींचे घबाड; नोटा मोजायला 80 अधिकाऱ्यांना लागले तब्बल 18 तास

किरीट सोमय्या 26 ऑक्टोबरला नांदेड दौऱ्यावर, सचिन सावंत म्हणतात, मी स्वागताला तयार!

Neet UG Result 2021 will be declare in next week said by Media Reports