NIOS Results 2021: एनआयओएसकडून दहावीसह बारावीचा निकाल जाहीर, निकाल नेमका कुठं पाहायचा?

| Updated on: Jul 24, 2021 | 11:15 AM

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगने दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला आहे. एनआयओएसचे विद्यार्थी nios. ac.in या वेबसाईटवर त्यांचा निकाल पाहू शकतात.

NIOS Results 2021: एनआयओएसकडून दहावीसह बारावीचा निकाल जाहीर, निकाल नेमका कुठं पाहायचा?
NIOS
Follow us on

नवी दिल्ली: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगने दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला आहे. हा निकाल 23 जुलै रोजी जाहीर करण्यात आला. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एनआयओएसनं हा निकाल जाहीर केला आहे. एनआयओएसचे विद्यार्थी nios. ac.in या वेबसाईटवर त्यांचा निकाल पाहू शकतात.

एनआयओएसनं ट्विट करुन निकालासंदर्भातील माहिती दिली आहे. एनआयओएसनं दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला असून विद्यार्थी https://results.nios.ac.in या वेबसाईटवर निकाल पाहू शकतात आणि डाऊनलोड करुन प्रिंट आऊट घेऊ शकतात.

NIOS चा दहावी आणि बारावीचा निकाल कसा पाहायचा?

स्टेप1 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
स्टेप 2 : त्यानंतर NIOS Results या पर्यायावर क्लिक करा
स्टेप 3 : नविन वेबपेज ओपन होईल त्यावर तुम्ही तुमचा परीक्षा क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती भरा.
स्टेप 4 : NIOS चा दहावी आणि बारावीचा निकाल ओपन होईल तो डाऊनलोड करा आणि प्रिंट ऑऊट घ्या.

दहावीचा निकाल 90.64 टक्के

एकूण 1 लाख 18 हजार869 विद्यार्थ्यांनी एनआयओएस इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, तर 1,69,748 विद्यार्थ्यांनी 12 वी इयत्तेसाठी नोंदणी केली होती. यावर्षी एनआयओएसचा दहावीचा निकाल 90.64 टक्के आणि 12 वीचा निकाल 79.21 टक्के लागला आहे. नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी 10 वीचे 1 लाख 7 हजार 745 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर 12 वीचे 1 लाख 34 हजार 466 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

ICSE, ISC Result 2021: आयसीएसई बोर्डाचे दहावी बारावीचे निकाल आज जाहीर होणार

काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) 10 वी व 12 वीचे निकाल (ICSE, ISC Result 2021) जाहीर होणार आहेत. आयसीएसईचे सचिव गॅरी अरथून यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. अरथून म्हणाले की, “दहावी आणि बारावीचे निकाल शनिवारी 24 जुलै रोजी दुपारी 3 वाजता जाहीर केले जातील. निकाल (CISCE Result 2021) परिषदेच्या संकेतस्थळावर आणि एसएमएसद्वारे उपलब्ध करुन दिला जाईल.आयसीएसईच्या वेबसाईटवरील करिअर पोर्टलच्या माध्यमातून शाळांसाठी गुणतालिका उपलब्ध करुन देण्यात येईल. शाळेच्या मुख्याध्यापकांच्या लॉगिन आयडी आणि पासवर्डचा वापर करून परिषदेच्या पोर्टलवर लॉग इन करून निकाल उपलब्ध होऊ शकतो. ”

इतर बातम्या:

ICSE, ISC Result 2021: आयसीएसई बोर्डाचे दहावी बारावीचे निकाल आज जाहीर होणार, निकाल कुठे पाहायचा?

Maharashtra HSC Result 2021: बारावीच्या निकालाचं काम करण्यास मुदतवाढ द्या, शिक्षक संघटनांची वर्षा गायकवाड यांच्याकडे मागणी

NIOS Results 2021 NIOS 10th 12th June exam results 2021 declared Know how to check