नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्यावतीनं नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच राष्ट्रीय पात्रता परीक्षा 2021 पुढील महिन्यात आयोजित करण्याचं निश्चित केलं आहे. 12 सप्टेंबर रोजी नीट यूजी परीक्षा आयोजित केली जाणार आहे. एनटीएनं परीक्षेपूर्वी परीक्षा केंद्र जाहीर केली आहेत. नीट यूजी परीक्षा देणारे विद्यार्थी neet.nta.nic.in या वेबसाईटला भेट देऊन परीक्षा केंद्र पाहू शकतात. विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करताना पसंतीक्रम दिलेल्या शहरांच्यानुसार परीक्षा केंद्रांची यादी जाहीर करण्यात आलीय.
राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट यूजी 2021 परीक्षा 12 सप्टेंबरला आयोजित केली झाणार आहे. विद्यार्थ्यांना या परीक्षेचं प्रवेशपत्र 9 सप्टेंबर रोजी मिळणार आहे. विद्यार्थी परीक्षेपूर्वी तीन दिवस अगोदर प्रवेशपत्र एनटीएच्या वेबसाईटवरुन डाऊनलोड करु शकतात. प्रवेशपत्र जाहीर होण्यासंदर्भातील तारीख जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.
स्टेप 1 : सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी एनटीएची अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in या वेबसाईटला भेट द्यावी
स्टेप 2 : वेबसाईटवरील प्रवेशपत्र लिंकवर क्लिक करावं
स्टेप 3 : अर्ज क्रमांक आणि पासवर्ड दाखल करावा
स्टेप 4 : प्रवेशपत्र ओपन होईल ते डाऊनलोड करुन सोबत ठेवावं
गेल्या वर्षी कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करीत 13 सप्टेंबर रोजी नीट परीक्षा घेण्यात आली. परीक्षेला एकूण 13.66 लाख उमेदवार परीक्षेला बसले होते, त्यापैकी 7,71,500 विद्यार्थी पात्र ठरले होते. यावर्षी ही परीक्षा इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, ओडिया, तामिळ, तेलगू आणि उर्दू या 11 भाषांमध्ये घेण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारनं नीट परीक्षेमध्ये अखिल भारतीय कोट्यातून ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी 27 टक्के तर आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 10 टक्के आरक्षण लागू केलं आहे. हे आरक्षण वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी लागू असेल.
इतर बातम्या:
NEET 2021 Exam Date: नीट यूजी परीक्षेची तारीख ठरली, www.nta.nic.in वेबसाईटवर उद्यापासून नोंदणी सुरु
NTA released neet ug centre list before declaring admit card for NEET UG 2021