Pariksha Pe Charcha 2025 Registration: ‘परीक्षा पे चर्चा’ 2025 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थी आणि पालक innovateindia1.mygov.in अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सहभागी होण्यासाठी अर्ज करू शकतात. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आपल्या सर्व संलग्न शाळांसाठी परीक्षा पे चर्चा 2025 संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. चला जाणून घेऊया ‘परीक्षा पे चर्चा 2025’साठी निवड कशी केली जाईल.
ऑनलाईन एमसीक्यू स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धकांची निवड केली जाणार आहे. ही ऑनलाईन स्पर्धा 14 जानेवारी रोजी संपणार असून सहावी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी ही स्पर्धा आहे. सर्व स्पर्धकांना ‘परीक्षा पे चर्चा’मध्ये सहभागी होण्याचे प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2025 आहे.
‘परीक्षा पे चर्चा’ची ही आठवी आवृत्ती आहे, जी जानेवारीमध्ये भारत मंडपम, नवी दिल्ली येथे होणार आहे. मुख्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निवड झालेल्या सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांना शिक्षण मंत्रालयातर्फे पीपीसी किट देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी पालक आणि शिक्षकांशी बोर्ड परीक्षांबाबत चर्चा करतील आणि विद्यार्थ्यांना टिप्स देतील.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये पंतप्रधान मोदी बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. तसेच, त्यांना परीक्षेचा दबाव आणि तयारीशी संबंधित टिप्स देतात. जे शिक्षण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईट, यूट्यूब आदींवर पाहता येईल. अधिक माहितीसाठी उमेदवार परीक्षा पे चर्चाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
लक्षात घ्या की, विद्यार्थी आणि पालक innovateindia1.mygov.in अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सहभागी होण्यासाठी अर्ज करू शकतात. सर्व स्पर्धकांना ‘परीक्षा पे चर्चा’मध्ये सहभागी होण्याचे प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2025 आहे. ‘परीक्षा पे चर्चा’ची ही आठवी आवृत्ती आहे, जी जानेवारीमध्ये भारत मंडपम, नवी दिल्ली येथे होणार आहे. मुख्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निवड झालेल्या सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांना शिक्षण मंत्रालयातर्फे पीपीसी किट देण्यात येणार आहेत.