मुंबई: नुकताच दहावीचा निकाल (SSC Results 2022) लागलाय. निकालानंतर लगबग असते ती पुढच्या कॉलेजच्या प्रवेशाची. सायन्स, कॉमर्स, आर्टस् की डिप्लोमा अशा गोंधळात विद्यार्थी असतात. मधले काही वर्ष पॉलिटेक्निक प्रवेशाचं प्रमाण कमी झालं होतं. परंतु आता ते वाढलंय. यंदा पॉलिटेक्निक प्रवेशाला (Polytechnic Admission) विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळालाय. पॉलिटेक्निकला दहावीच्या गुणांवर प्रवेश मिळतो. दरम्यान पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरु करण्यात आली होती यासाठी ऑनलाइन अर्ज (Online Application) करायचा होता. या प्रवेशा अर्जाची शेवटची तारीख 7 जुलैपर्यंत होती. आता या प्रवेशासाठी मुदतवाढ करण्यात आलीये. 14 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तंत्रशिक्षण संचलनालयातर्फे पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अभ्यासक्रमासाठी राज्यभरात 1 लाखांहून अधिक जागा आहेत. या जागावर प्रवेश मिळवण्यासाठी दहावी उतीर्ण विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दहावीचा निकाल जाहीर होण्याअगोदर सुरू झालेली प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्याची मुदत 7 जुलैपर्यंत होती. ही मुदत संपल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे. 14 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यंदा पॉलिटेक्निक प्रवेशाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळालाय.आतापर्यंत 1 लाख 20 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी 84 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी शुल्क भरुन अर्ज कन्फर्म केले आहेत.