नवी दिल्ली: बारावीच्या परीक्षांवर सध्या देशात चर्चा सुरू आहे. नवी दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष शिसोदिया यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे आणि त्यानंतरच बोर्ड परीक्षा घेण्यात याव्यात, अशी भूमिका मांडली होती. त्यानंतर आता पंजाबचे शिक्षणमंत्री विजय इंदर सिंगला यांनीदेखील सीबीएसईनं परीक्षा आयोजित करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचं लसीकरण करणं महत्त्वाचा आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांचे लसीकरण केल्यानंतरच परीक्षा घेण्यावर विचार केला जावा अशी भूमिका त्यांनी मांडली. (Punjab Education Minister demanded class 12th students vaccinated first then take decision of cbse board exam 2021)
विजय इंदर सिंगला यांनी मांडलेल्या मतानुसार बारावीच्या परीक्षा आयोजित करण्यापूर्वी विद्यार्थी आणि शिक्षक यांचे लसीकरण करण्यात यावे. कारण, विद्यार्थी आणि शिक्षकांची सुरक्षा ही महत्त्वाचे आहे. त्यांची प्रकृती आणि ते सुरक्षित राहणं हे महत्त्वाचं आहे. या शिवाय त्यांनी केवळ महत्त्वाच्या विषयांची परीक्षा आयोजित केली जावी, प्रश्नपत्रिकेतील प्रश्न संख्या कमी केली जावी. अंतर्गत मूल्यमापन किंवा याकडेही लक्ष दिले जावे अशी भूमिका मांडली.
विजय इंदर सिंग ला पुढे म्हणाले कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे उच्च शिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया लांबणार आहे. केंद्र सरकारने सर्व विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी विद्यापीठे आणि कॉलेज येथील निर्देश जारी करावेत, अशी मागणी देखील त्यांनी केली. उच्च शिक्षण संस्थांमधील अभ्यासक्रम देखील कमी केला जावा यामुळे विद्यार्थ्यांवरील ताण कमी होईल, असे देखील विजय इंदर सिंगला म्हणाले.
सिंगला यांनी सांगितले की बारावीच्या परीक्षा नंतर उच्च शिक्षण संस्था म्हणजेच महाविद्यालयांमध्ये होणार असलेल्या परीक्षांमध्ये त्यांना सेमिस्टर परीक्षा आयोजित करण्याची गरज नाही. त्यांनी याबाबत एक उदाहरण देताना सांगितले की अभ्यासक्रम जर 8 सेमिस्टरचा असेल तर तो 7 सेमिस्टर मध्येच पूर्ण केला जाऊ शकतो. यामुळे विद्यार्थ्यांवरीलमानसिक तणाव कमी होण्यास मदत होईल असेदेखील ते म्हणाले.
रविवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर नवी दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा मुद्दा प्रकर्षाने मांडलेला होता. याशिवाय महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील लसीकरणाच्या मुद्द्याला हात घालत विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची सुरक्षा महत्त्वाचं असल्याचं म्हटलं होतं. बारावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर लसीकरणावर चर्चा व्हावी. अशी भूमिका बैठकीत मांडल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
संबंधित बातम्या
बारावीच्या परीक्षा ऑनलाईन नको, 300 विद्यार्थ्यांची सरन्यायाधीशांकडे धाव, नेमकं प्रकरण काय?
गुजरातचं ठरलं, बारावीच्या परीक्षा ‘या’ तारखेपासून, महाराष्ट्राचा निर्णय कधी होणार?
Punjab Education Minister demanded class 12th students vaccinated first then take decision of cbse board exam 2021