मुंबई : अंबानी कुटुंबाची होणारी सून अर्थात राधिका मर्चेंट ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. विशेष म्हणजे अनेक कार्यक्रमांमध्ये राधिका मर्चेंट ही कायमच दिसते. राधिका मर्चेंट हिच्याबद्दल अनेकांना जाणून घ्यायचे आहे. सध्या आकर्षणाचे मेन केंद्रच राधिका मर्चेंट ही दिसतंय. विशेष म्हणजे राधिका मर्चेंट ही उच्च शिक्षित आहे. फक्त देशातच नाही तर विदेशात देखील राधिका मर्चेंट हिने शिक्षण घेतले आहे. शालेय शिक्षण राधिका मर्चेंट हिचे मुंबईमध्येच झाले आहे.
विशेष म्हणजे अनंत आणि राधिका यांचे शिक्षण एकाच शाळेत झाले. राधिका मर्चेंटचे शिक्षण हे मुंबईतील जॉन कॉनन स्कूल आणि इकोले मॉन्डिएल वर्ल्ड स्कूलमध्ये झाले आहे. त्यानंतर पुढील शिक्षण राधिका हिने न्यूयॉर्कमध्ये घेतले. विशेष म्हणजे राधिका मर्चेंट हिने न्यूयॉर्क विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राजकारण या विषयात पदवी घेतली. यानंतर राधिक थेट रिअल इस्टेट या क्षेत्रामध्ये उतरली. तिने तिच्याच फर्ममधून काम करण्यास सुरूवात केली.
राधिका मर्चेंट टाॅपची विद्यार्थी होती. फक्त अभ्यासच नाही तर स्विमिंग, रीडिंग आणि ट्रेकिंगची देखील राधिकाला मोठी आवड आहे. राधिका मर्चेंट हिचा जन्म 18 डिसेंबर 1994 रोजी झालाय. राधिकाचे वडील हे मोठे बिजनेस मॅन आहेत. अनेक कंपन्या या त्यांच्या असून इनकोर हेल्थकेयरचे ते सीईओ देखील आहेत.
राधिका मर्चेंट ही एक क्लासिकल डांन्सर देखील आहे. डान्सची मोठी आवड ही राधिका मर्चेंट हिला आहे. राधिका मर्चेंट हिने क्लासिकल डान्सची खास ट्रेनिंग देखील घेतली आहे. मुंबईचे गुरु भवन ठाकर यांच्याकडून तिने ट्रेनिंग घेतली आहे. भरतनाट्यम डांन्सर राधिका आहे. फॉर्मल ट्रेनिंग राधिका मर्चेंट हिची पूर्ण देखील झाली आहे.
राधिका मर्चेंट आणि अनंत यांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. नेहमीच अंबानी कुटुंबाकडून आयोजित करण्यात आलेल्या प्रत्येक कार्यक्रमात राधिका मर्चेंट ही उपस्थित असते. राधिका मर्चेंट हिच्याबद्दल अनेकांना जाणून घ्यायचे आहे. राधिका मर्चेंट हिचे अनेक फोटो हे देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.