UPSC संयुक्त वैद्यकीय सेवेच्या 687 जागांसाठी भरती प्रक्रिया… ही आहे शेवटची तारीख

| Updated on: Apr 06, 2022 | 10:07 PM

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2022 साठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर 6 ते 26 एप्रिलपर्यंत अर्ज प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

UPSC संयुक्त वैद्यकीय सेवेच्या 687 जागांसाठी भरती प्रक्रिया... ही आहे शेवटची तारीख
UPSC संयुक्त वैद्यकीय सेवेच्या 687 जागांसाठी भरती
Image Credit source: TV9
Follow us on

नवी दिल्लीः केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससीतर्फे (UPSC) या वर्षीसाठी संयुक्त वैद्यकीय सेवेसाठी (Joint Medical Services) एकूण 687 जागांसाठी भरती (Recruitment) प्रक्रिया राबविण्यात येत आहे. नुकतेच आयोगाच्या वेबसाईटवर याची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. 6 एप्रिलपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना युपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर www.upsc.gov.in वर जाउन अधिक तपशिल पाहता येणार आहे. मागील वर्षी या परीक्षेसाठी एकूण 838 पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. तर आता जागांची संख्या कमी झाली असली तरी वैद्यकीय सेवेत येण्यास इच्छूक उमेदवारांना ही चांगली संधी असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे काढण्यात आलेल्या भरतीबाबत काही महत्वाच्या तारखा उमेदवारांनी लक्षात ठेवणे आवश्‍यक आहे. अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख 26 एप्रिल असून त्यादिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. यासाठी उमेदवारांनी पहिल्यांदा युपीएससीच्या वेबसाईटवर देण्यात आलेली जाहिरातीमधील संपूर्ण बारकावे नीट वाचणे आवश्‍यक आहे.

असा करा अर्ज :

युपीएससी संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2022 साठी अर्ज करण्यासाठी सर्वात पहिली युपीएससीच्या www.upsc.gov.in या वेबसाईटवर जावे. त्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या Apply online या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Combined Medical Services Examination या लिंकवर जावे. त्यानंतर रजिंस्ट्रेशन करावे. त्यानंतर परीक्षेसाठी अर्ज भरु शकतात. पूर्ण अर्ज भरल्यावर त्याची प्रिंट काढून घ्यावी.

जागांचा तपशिल असा

एकूण 687 पदांसाठी ही भरती केली जात आहे. यात ज्युनिअर स्केल पोस्टवर केंद्रीय आरोग्य सेवेसाठी 314 जागा, सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी रेल्वेसाठी 300 जागा, वैद्यकीय अधिकारी ग्रेड 2 साठी 3 जागा, जनरल ड्युटी वैद्यकीय अधिकारी दिल्ली महापालिकासाठी 70 जागांवर भरती घेतली जाणार आहे.

संबंधित बातम्या 

KDMC : केडीएमसीत असिस्टंट नर्स पदांसाठी भरती! थेट मुलाखत होणार, अप्लाय कसं करायचं? जाणून घ्या

तरुण उद्योजकांना सुवर्णसंधी… कामगार मंत्रालयाकडून 112 जागांसाठी भरती

Join Indain Army: भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी ‘अग्निपथ’ बनणार नवा मार्ग, युवक होणार ‘अग्निवीर’ म्हणून सामील