मुंबई : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत शैक्षणिक वर्ष (Academic year) 2022-23 करीता वंचित व दुर्बल घटकातील बालकांच्या प्रवेशासाठी 25 टक्के जागा राखीव असतात. ज्यालाच आपण आरटीई (RTE) असे म्हणतो. ऑनलाइन लॉटरी काढून यामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. ऑनलाइन लॉटरी प्रवेश प्रक्रियेत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना (Student) प्रवेश घेण्यासाठी आता शेवटीची संधी देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांचे कागदपत्र तपासली जातील आणि मगच त्यांचा प्रवेश निश्चित केला जाईल.
आरटीईच्या प्रवेशासाठी 15 हजार 50 विद्यार्थ्यांचे अर्ज समितीकडे आले आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध 341 शाळांमधून 6 हजार 451 प्रवेश निश्चिती करण्यासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या जागेंसाठीच उद्यापर्यंतची मुदत आहे. नर्सरीसाठी आता किमान वय 3 वर्षे, तर कमाल वयोमर्यादा 4 वर्ष 5 महिने आणि 30 दिवस असणे आवश्यक आहे. यासाठी संबंधीत बालकाचा जन्म हा 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधी दरम्यान झालेला असणे आवश्यक आहे.
शिक्षक हक्क कायद्यानुसार दरवर्षी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये 25 टक्के आरक्षित जागांवर ही प्रवेश प्रक्रिया राज्यभर राबवली जाते. यासाठी केलेल्या अर्जांची संगणकीय पद्धतीनं लॉटरी काढली जाते. राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्या उपस्थितीमध्ये ही लाॅटरी काढली जाते. लाॅटरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावे लागतात, त्यांना कागदपत्र तपासणी करून प्रवेश दिला जातो. यासाठी वेगवेगळ्या स्टेप देखील असतात. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे कागदपत्र समितीकडे येत नाही आणि त्रुटी निघतात, अशाचा प्रवेश रद्द करून वेटिंगमधील विद्यार्थ्यांना संधी दिली जाते.
संबंधित बातम्या :