पुणे विद्यापीठाच्या शांतीश्री धुलीपुडी पंडिंत यांची जेएनयूच्या कुलगुरुपदी निवड, पहिल्या महिला कुलगरु होण्याचा बहूमान

| Updated on: Feb 07, 2022 | 12:51 PM

शांतीश्री धुलीपुडी पंडित या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. 1988 पासून त्यांना अध्यापनाचा अनुभव आहे.

पुणे विद्यापीठाच्या शांतीश्री धुलीपुडी पंडिंत यांची जेएनयूच्या कुलगुरुपदी निवड, पहिल्या महिला कुलगरु होण्याचा बहूमान
Shantishree Dhulipudi Pandit
Follow us on

JNU First Women Vice Chancellor नवी दिल्ली: देशातील प्रमुख केंद्रीय विद्यापीठ जवाहलाल नेहरु विद्यापीठाच्या (JNU) कुलगुरु पदी प्रा. शांतीश्री धुलीपुडी पंडित (Shantishree Dhulipudi Pandit) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शांतीश्री धुलीपुडी पंडित या सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. जेएनयूचे कुलगुरु एम. जगदीश कुमार यांची यूजीसीच्या (UGC) अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जेएनयूच्या कुलगुरुपदावर धुलीपुडी यांडी निवड करण्यात आली आहे. प्रा. शांतीश्री धुलीपुडी पंडित यांची नियुक्ती 5 वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्लीच्या त्या पहिल्या कुलगुरु ठरल्या आहेत.
शांतीश्री धुलीपुडी पंडित या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. 1988 पासून त्यांना अध्यापनाचा अनुभव आहे.

प्रा.शांतीश्री धुलीपुडी पंडित सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यरत

जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती झालेल्या शांतीश्री धुलीपुडी पंडित या सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यरत आहेत. त्या आता एम. जगदिश कुमार यांच्या निवृत्तीमुळं रिक्त झालेल्या जागेवर कार्यभार सांभाळतील.

शांतीश्री धुलीपुडी पंडित कोण आहेत?

शांतीश्री धुलीपुडी पंडित या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. 1988 पासून त्यांना अध्यापनाचा अनुभव आहे. तर, त्या 1985 पासून संशोधन करत आहेत. त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून फेलोशिप देखील मिळाली आहे. त्यांनी यापूर्वी गोवा विद्यापीठात देखील काम केलं आहे. शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी विविध समित्यांवर काम केलं आहे. पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली 23 विद्यार्थ्यांनी पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. तर, 8 विद्यार्थ्यांनी एम.फिल. केलं आहे.

जगदीश कुमार यूजीसीच्या अध्यक्षपदी

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदी एम.जगदीश कुमार यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचा जेएनयूमधील कार्यकाळ 26 जानेवारी 2021 रोजी संपला होता. त्यानंतर त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती.

इतर बातम्या:

किरण माने पुन्हा मैदानात, उद्या पत्रकार परिषद घेणार, अनेकांची गुपितं उघड करण्याचा इशारा

Parambir Singh: हिरेन प्रकरणाचा मास्टरमाइंड परमबीर सिंगच, काही बातम्या सिस्टिमॅटिकली पेरल्या जाताहेत; सतेज पाटील यांचा आरोप

Shantishree Dhulipudi Pandit professor of Savitribai Phule Pune University appointed as JNU First Women Vice Chancellor