कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरला बंगळुरु येथील राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेकडून ए प्लस प्लस मानांकन मिळालं आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के यांनी ही माहिती दिली. विद्यापीठाच्या सर्व घटकांचं अभिनंदन करतो, असं ते म्हणाले. नॅकच्या नव्या मानांकनासह 3.52 गुण मिळवत शिवाजी विद्यापीठ राज्यात अव्वल ठरलं आहे. (Shivaji University Kolhapur accredited by NAAC achieved A ++ CGPA)
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या शैक्षणिक प्रगतीचं मूल्यमापन बंगळुरु येथील राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेकडून करण्यात आलं होते. शिवाजी विद्यापीठाचं यापूर्वी तीनवेळा मूल्यांकन झालेलं आहे. विद्यापीठाला तिसऱ्या टप्प्यातील मूल्यांकनामध्ये ‘ए’ मिळालं होतं. आता चौथ्या टप्प्यातील मूल्यांकनामध्ये ए प्लस प्लस मानांकन मिळालं आहे. नव्या गुणांकन पद्धतीनुसार 3.52 इतके गुणं मिळाले आहेत. विद्यापीठाला मिळालेल्या मानांकनामुळं जबाबादारी वाढल्याचं कुलगुरुंनी सांगितलं.
शिवाजी विद्यापीठानं नॅकच्या निकषामध्ये संशोधनातील कामगिरी, नाविन्यपूर्ण उपक्रम यासह अने निकषांमध्ये बाजी मारली आहे. नॅकच्या सर्वोच्च मानांकनामुळे विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. नॅककडून 3.52 इतक मानांकन मिळाल्यानं विद्यापीठातील प्रशासकीय प्रमुख प्राध्यापक तसेच अधीविभागांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांनी नॅक मूल्यांकनात मिळालेल्या यशाबद्दल विद्यापीठातील सर्व विभाग, विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी , प्रशासकीय कर्मचारी, संलग्नित महाविद्यालयं, सिनेट सदस्य यांचे आभार मानले आहेत. शिर्के यांनी पुढील काळात आता मिळवलेलं यश कायम ठेवण्यासोबतच शिक्षण क्षेत्रात नवी झेप घेण्याचं आव्हान आपल्यासमोर असल्याचं सांगितलं.
डॉ. डी. टी. शिर्के आक्टोबरमध्ये कुलगुरुपदी
डॉ.दिगंबर शिर्के यांनी ऑक्टोबर महिन्यात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून कार्यभार स्वीकारला होता. त्यांचे मुळ गाव हातकंणगले तालुक्यातील वाठार वडगाव आहे. शिर्के यांनी शिवाजी विद्यापीठात संख्याशास्त्र विषयात एम.एस्सी, एम फिल, पीएच.डी केली. त्यांनी संख्याशास्त्र विभागाचे विभागप्रमुख, कुलसचिव, प्र-कुलगुरू पदावर काम केले आहे. शिक्षण क्षेत्रातील 33 वर्षांचा त्यांना अनुभव आहे.
दरम्यान, शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील अव्वल विद्यापीठ समजलं जातं. विद्यापीठाचं कार्यक्षेत्र कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांमध्ये आहे.
IBPS Clerk Main Result 2020 Declared: आयबीपीएस क्लार्क मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर , ibps in वर पाहा निकालhttps://t.co/FTVRnM67qQ#IBPS | #IBPSclerkresult | #IBPSclerkresultdeclared | #Bankclerk
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 1, 2021
संबंधित बातम्या:
Shivaji University | शिवाजी विद्यापीठाच्या परिक्षा लांबणीवर? परिक्षा मंडळाकडून लवकरच निर्णय अपेक्षित
Kolhapur Corona Care | कोल्हापूर | शिवाजी विद्यापीठाच्या वसतिगृहात कोविड केअर सेंटर
(Shivaji University Kolhapur accredited by NAAC achieved A ++ CGPA)