दहावी, बारावीच्या परीक्षेत यंदापासून हा महत्वाचा बदल

| Updated on: Feb 18, 2024 | 8:11 AM

CBSE Class 10th, 12th Board Exam Pattern 2024 | दहावी, बारावीची परीक्षा आता काही दिवसांवर आली आहे. केंद्रीय शिक्षण मंडळाने या परीक्षेसाठी काही महत्वाचे बदल केले आहेत. यंदापासूनच हे बदल लागू होणार आहेत.

दहावी, बारावीच्या परीक्षेत यंदापासून हा महत्वाचा बदल
परिक्षा
Image Credit source: Social Media
Follow us on

पुणे, दि. 15 फेब्रुवारी 2024 | दहावी, बारावीच्या परीक्षेला शिक्षणातील टर्निंग पाईंट म्हटले जाते. या परीक्षेनंतर कोणत्या क्षेत्रात करियर करायचे आहे, याचा निर्णय विद्यार्थी घेतात. आता दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. या परीक्षेसंदर्भात महत्वाचे बदल केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने केले आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (CBSE) परीक्षा येत्या 15 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये सीबीएसई बोर्डाने बदल केला आहे. हा बदल ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह पातळीवर केला आहे. यंदापासून सीबीएसईने बहुपर्यायी (MCQ) प्रश्नांची संख्या वाढवली आहे. तसेच डिस्क्रीपटीव्ह म्हणजे वर्णनात्मक प्रश्नांची संख्या कमी केली आहे.

10 वी, 12वी साठी असा असणार पॅटर्न

सीबीएसई बोर्डाने 10वीच्या परीक्षेसाठी 50 टक्के प्रश्न योग्यता बेस्ड ठेवले आहे. तसेच केस-बेस्ड प्रश्न आणि सोर्स बेस्ड इंटिग्रेटेड प्रश्न विचारले जाणार आहे. दहावीत 20% प्रश्न बहुपर्यायी तर 30% शॉर्ट एंड लॉन्ग असणार आहे. सीबीएसई 12 बारावीसाठी पॅटर्नमध्ये 40% प्रश्न योग्यता आधारावर असणार आहे. 20% प्रश्न एमसीक्यू पद्धतीचे तर 40% शॉर्ट एंड लॉन्ग उत्तरे असणारी प्रश्न असणार आहेत.

टॉपर्स नाही अन् टक्केवारी नाही

CBSE 10वी, 12वीच्या निकालात टॉपर्स जाहीर करणार नाही. तसेच टक्केवारी देणार नाही. डिव्हिजन आणि डिस्टिंक्शन मार्क्स सांगणार नाही. तसेच एकूण गुणांच्या आधारे प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणी दिली जाणार नाही. 90% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी ‘डिस्टिंक्शन’ श्रेणीही बंद करण्यात आली आहे. बोर्ड कोणत्याही विद्यार्थ्याच्या गुणांची एकूण टक्केवारी मोजणार नाही. उच्च शिक्षण किंवा नोकरीसाठी 10वी किंवा 12वीच्या गुणांची टक्केवारी आवश्यक असल्यास, प्रवेश संस्था किंवा नियोक्त्याद्वारे मोजली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

दहावी, बारावी परीक्षांचे हॉल तिकीट बोर्डाने जारी केले आहेत. हे हॉल तिकीट शाळा आणि संबंधित महाविद्यालयात दिल जात आहे.

हे ही वाचा

दहावी, बारावी परीक्षेत प्रॅक्टिकल गुणांसंदर्भात महत्वाचा बदल