SSC Stenographer Exam City 2024 Released: तुम्ही SSC Stenographer च्या ग्रेड C आणि ग्रेड D पदांसाठी अर्ज केला आहे का? केला असेल तर स्टाफ सिलेक्शन कमिशनने Stenographer ग्रेड C आणि ग्रेड D पदांच्या भरती परीक्षेसाठी परीक्षा सिटी स्लिप जारी केली आहे. तुम्ही ssc.nic.in अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचे परीक्षा शहराची यादी तपासू शकतात. परीक्षा आयोगातर्फे 11 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणारे उमेदवार पुढील भरती प्रक्रियेसाठी पात्र मानले जातील. SSC Stenographer ग्रेड C आणि D पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची लिंक 26 जुलै रोजी चालू करण्यात आली होती. नोंदणीची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2024 रात्री 11 वाजेपर्यंत होती. तर अर्ज शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2024 होती. उमेदवार खाली दिलेल्या सोप्या स्टेप्सद्वारे परीक्षा सिटी स्लिप डाउनलोड करू शकतात.
सर्व उमेदवारांना सामावून घेण्यासाठी ही परीक्षा अनेक शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. ठराविक शिफ्टची वेळ आणि परीक्षा केंद्राचे नेमके ठिकाण अशी माहिती प्रवेशपत्रावर देण्यात येणार आहे. उमेदवारांना SSC च्या अधिकृत वेबसाईटवरून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
भरती प्रक्रियेत दोन टप्पे असतात. पहिला टप्पा म्हणजे संगणक-आधारित परीक्षा (CBE), जिथे उमेदवारांची बहुपर्यायी प्रश्नांद्वारे सामान्य जागरूकता, तर्क कौशल्य आणि इंग्रजी भाषेतील प्रवीणतेवर चाचणी केली जाते.
CBE मध्ये पात्र ठरलेले लोक स्टेनोग्राफी स्किल टेस्ट या दुसऱ्या टप्प्यात जातील. ही चाचणी उमेदवाराच्या स्टेनो स्पीडवर आहे.
SSC Stenographer कट ऑफ पाहण्यासाठी उमेदवारांनी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करायला हव्यात.