उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्यांनी लिहिल्या लव्हस्टोरी, शिव्या, कामसूत्र…विद्यापीठाने मग काय केले पाहा

| Updated on: Dec 01, 2023 | 6:46 PM

आपण परीक्षांमध्ये अनेकदा विद्यार्थ्यांकडून काही बाही विचित्र प्रकार केल्याचे ऐकले असेल. काही जण कविता, प्रेमपत्रं आणि चित्रपटाची गाणी आणि डायलॉग लिहील्याचे ऐकले असेल. आता एका विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत चक्क कामसूत्र, लव्हस्टोरी, तसेच प्राध्यापक, प्रिन्सिपल यांना शिव्यांची लाखोली वाहिल्याचा प्रकार घडला आहे.

उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्यांनी लिहिल्या लव्हस्टोरी, शिव्या, कामसूत्र...विद्यापीठाने मग काय केले पाहा
EXAM
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

सुरत | 1 डिसेंबर 2023 : शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते पवित्र मानले जाते. विद्यार्थ्यांकडे देशाचे भविष्य म्हणून पाहीले जाते. विद्यार्थ्यांची परीक्षा त्यांनी किती ज्ञान अर्जित केले हे कळण्याचा एक मार्ग समजला जातो. परंतू बीए – बीकॉमच्या विद्यार्थ्यांनी युनिव्हर्सिटीच्या उत्तरपत्रिकात लव्हस्टोरी, कामसूत्रची कहानी आणि प्रिन्सिपल, प्रोफेसर आणि मॅडमना शिव्यांची लाखोली वाहीली असेल तर याला काय म्हणाल ? हे खळबळजनक प्रकरण वीर नर्मद दक्षिण गुजरात युनिव्हर्सिटीचे आहे. युनिव्हर्सिटीच्या परीक्षेत अशा गलिच्छ भाषेचा वापर करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांनी ओळख पटली आहे.

वीर नर्मद दक्षिण गुजरात युनिव्हर्सिटीच्या उत्तर पत्रिकते अपशब्द लिहीणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची ओळख पटली आहे. या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना परीक्षेत झीरो गुण देण्यात आहेत. तसेच प्रत्येकी 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या सहा विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याने उत्तरेकडील कामसूत्राची कहानी लिहीली आहे. तर एका विद्यार्थ्याने त्याच्या सहकारी विद्यार्थी आणि विद्यार्थीनीची लव्हस्टोरी लिहीली आहे. विद्यापीठाने या विद्यार्थ्यांना बोलावून त्यांची बाजू ऐकली, त्यावेळी त्यांनी आपली चूक कबूल केली आणि लेखी स्वरुपात माफी मागितली आहे.

फिटनेस सर्टीफिकेट द्यावे लागणार

या प्रकरणातील विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले नसल्याने त्यांची सुनावणी मेडीकल फेकल्टीच्या प्रोफेसरांसमोर झाल्याचे वीर नर्मद दक्षिण गुजरात युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर किशोर सिंह चावडा यांनी सांगितले. त्यावेळी त्याचं मानसिक आरोग्य उत्तम असल्याचं आढळलं. आम्ही त्यांना एक संधी देत लेखी माफी मागण्यास सांगितल्याचे चावडा म्हणाले. अशा प्रकरणातील शिक्षा देण्याच्या पद्धतीत बदल केला आहे. जर यापुढे कोणी असा प्रकार केला तर त्याला मानसिक फिटनेस सर्टीफिकेट सादर करावे लागेल. परीक्षा दिल्यानंतर त्याला फॉर्म भरण्यास परवानगी दिली जाईल असे सूत्रांनी सांगितले.

अश्लिल भाषेचा अनेकदा वापर

उत्तर पत्रिकेत अशा प्रकारे अश्लिल भाषेचा वापर करण्याचा प्रकार अनेकवेळा घडला आहे. त्यावरुन या मुलाचे मानसिक आरोग्य ठिक नसल्याचे म्हटले जाते. आता जर असा प्रकार घडला तर 1000 रुपय दंड आकारला जाणार आहे. आणि मानसतज्ज्ञांकडून मानसिकदृष्ट्या फिट असल्याचे सर्टीफीकेट्स प्रिन्सिपलला द्यावे लागणार आहे. जर हे प्रमाणपत्र सादर केले तरच पुढील परीक्षेचा फॉर्म भरु दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.