Government Jobs: एका मुलीला तीन सरकारी नोकरीत यश, गावात राहून कोचिंग न लावता गाठला यशचा टप्पा

| Updated on: Nov 30, 2024 | 4:01 PM

Government Jobs: तेलंगणा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापकची नोकरी मिळाली. तसेच तेलंगणा राज्य पोलीस भर्ती मंडळाच्या परीक्षा पोलीस कॉस्टेबल म्हणून यश मिळाले. तसेच आयोगाच्या परीक्षेच्या माध्यमातून ग्रुप IV परीक्षेत यश मिळाले.

Government Jobs: एका मुलीला तीन सरकारी नोकरीत यश, गावात राहून कोचिंग न लावता गाठला यशचा  टप्पा
UPSC
Follow us on

Bhogi Sammakka Government Jobs: सरकारी नोकरी हे अनेकांचे स्वप्न असते. अनेक युवक, युवती सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असतात. त्यासाठी स्पर्धा परीक्षांचा रात्रंदिवस अभ्यास करतात. परंतु यश मात्र मोजक्या लोकांना येते. परंतु एक नव्हे तर तीन-तीन ठिकाणी कोणाला यश मिळू शकते का? कोणतेही कोचिंग न लावता सरकारच्या तीन विभागांमध्ये निवड होत शकते का? गावात राहून असे यश मिळवता येते का? या प्रश्नांचे उत्तर होय आहे. ज्युनिअर लेक्चरर, पोलीस काँस्टेबल आणि टीजीपीएससीची ग्रुप IV परीक्षेत भोगी सम्मक्का या मुलीने हे यश मिळवले आहे. आता तिने आयएएस क्रॅक करण्याचे लक्ष ठेवले आहे.

आयएएस परीक्षेकडे लक्ष्य

तेलंगाणामधील भोगी सम्मक्का सध्या चर्चेत आली आहे. ती तेलंगाणामधील भद्रादी कोठागुडेम जिल्ह्यातील दम्मापेटा गावात राहते. तिने कठोर मेहनतीने यश मिळवले आहे. भोगी सम्मक्का हिचे शालेय शिक्षण सरकारी शाळेत झाले. दहावी आणि बारावीचे शिक्षण गावाच्या जवळपास असलेल्या महाविद्यालयातून केले. त्यानंतर उस्मानिया विद्यापीठातून इंग्रजीत पदवीत्तर पदवी घेतली. सम्मक्का म्हणते, पदवी मिळाल्यानंतर मी पुन्हा गावात आली. घरीच एका खोलीत बसून अभ्यास सुरु केला. त्या मेहनतीला यश आले, त्याचा मला आनंद आहे. परंतु माझे लक्ष्य अजून लांब आहे. मला आयएएस अधिकारी बनायचे आहे. त्यासाठी माझी तयारी सुरु आहे.

घरी बसून अभ्यास शक्य

तेलंगणा राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या ज्युनिअर लेक्चरर, पोलीस काँस्टेबल आणि टीजीपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यामुळे तिला एक नव्हे तीन सरकारी नोकरीच्या ऑफर आहेत. सम्मक्का म्हणते, मी घरी अभ्यास करुन हे यश मिळवले आहे. कोणत्याही कोचिंग क्लॉसचे मार्गदर्शन मला मिळाले नाही. अनेकांना वाटते सरकारी नोकरी मिळवण्यासाठी कोचिंगची गरज आहे. परंतु हे सत्य नाही. अभ्यास तुम्ही घरी राहूनही करु शकतात.

सम्मक्का हिची आई भोगी रमना आणि वडील भोगी सत्यम आहे. तिच्या वडीलांचा छोटा व्यवसाय आहे. आई अंगणवाडी सेविका आहे. तिला तेलंगणा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापकची नोकरी मिळाली. तसेच तेलंगणा राज्य पोलीस भर्ती मंडळाच्या परीक्षा पोलीस कॉस्टेबल म्हणून यश मिळाले. तसेच आयोगाच्या परीक्षेच्या माध्यमातून ग्रुप IV परीक्षेत यश मिळाले.