TET Results: टीईटी परीक्षेच्या निकालाची अजूनही प्रतीक्षा, उमेदवार संतप्त!

| Updated on: Aug 02, 2022 | 11:56 AM

तरीदेखील राज्य परीक्षा परिषदेला संबंधित परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे संबंधित परीक्षेचा निकाल नेमका लागणार तरी कधी, असा सवाल शिक्षक (Teachers) भरतीसाठी इच्छुक उमेदवार उपस्थित करत आहेत.

TET Results: टीईटी परीक्षेच्या निकालाची अजूनही प्रतीक्षा, उमेदवार संतप्त!
Board Exam
Image Credit source: Official Website
Follow us on

पुणे : कोरोना (Corona) पार्श्वभूमीवर, टीईटी परीक्षा दोन वर्षांपासून रखडली होती. त्यानंतर डीएड, बीएड पात्रताधारकांकडून वारंवार होत असलेल्या परीक्षेच्या मागणीमुळे 21 नोव्हेंबर 2021 ला संबंधित परीक्षा घेण्यात आली. दोन वर्षे परीक्षा झाली नसल्याने यंदा परीक्षार्थी विद्यार्थ्यांची नोंदणी वाढली होती. आता मात्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) होऊन बराच कालावधी उलटून गेलाय तरीसुद्धा निकाल लागलेला नाही. राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी होऊन तब्बल आठ महिन्यांचा काळ लोटला. तरीदेखील राज्य परीक्षा परिषदेला संबंधित परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे संबंधित परीक्षेचा निकाल नेमका लागणार तरी कधी, असा सवाल शिक्षक (Teachers) भरतीसाठी इच्छुक उमेदवार उपस्थित करत आहेत.

आठ महिने उलटले; परीक्षा दिलेल्या उमेदवारांत संताप

सगळ्या गोष्टींची तपासणी करून निकाल जानेवारीत जाहीर केला जाऊ शकतो, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात जुलै महिना संपला तरी निकाल जाहीर होऊ शकला नाही, त्यामुळे परीक्षा दिलेले उमेदवार संतप्त झाले. कोरोना पार्श्वभूमीवर, टीईटी परीक्षा दोन वर्षांपासून रखडली होती. त्यानंतर डीएड, बीएड पात्रताधारकांकडून टीईटी परीक्षेचे प्राथमिक स्तरावरील पेपर-1 व माध्यमिक स्तरावरील पेपर 2 साठी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तीन लाखांहून अधिक आहे. परीक्षेनंतर परीक्षा परिषदेने अंतरिम उत्तरसूची जाहीर केली. अंतरिम सूचीवर आक्षेप नोंदविण्यासाठी विद्यार्थ्यांना आठ दिवसांचा कालावधी देण्यात आला. यामध्ये जवळपास 250 हून अधिक आक्षेप आले. यामध्ये प्रश्नांमधील चुकांमुळे वाक्याचा अर्थ बदल, शब्दाचा अर्थ बदल त्यामुळे परीक्षार्थीमध्ये संभ्रम निर्माण झाल्याच्या तक्रारींसह काही माध्यमांच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न चुकलेले असल्याचे आक्षेपांमध्ये नमूद करण्यात आले होते. आक्षेपांच्या छाननीमध्ये तथ्यता तपासून निकाल जानेवारीत जाहीर केला जाऊ शकतो, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात जुलै महिना संपला तरी निकाल जाहीर होऊ शकला नाही, त्यामुळे टीईटी परीक्षा दिलेले उमेदवार संतप्त झाले.