नवी दिल्ली : युजीसी नेट परीक्षेच्या अर्जांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी ‘करेक्शन विंडो’ खुली करण्यात आली आहे. युजीसी नेट परीक्षा घेणार्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएने ही विंडो खुली केली आहे. ज्या उमेदवारांनी 2 फेब्रुवारी ते 9 मार्च 2021 पर्यंत युजीसी नेट अर्ज भरला होता, ते त्यांच्या अर्जात सुधारणआ करु शकतात. अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी उमेदवारांना एनटीए युजीसीच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची अंतिम तारीख 16 मार्च 2021 आहे. अंतिम तारखेनंतर अर्जामध्ये कोणताही बदल करता येणार नसल्याचे एनटीएने कळवले आहे. (The correction window of UGC NET exam application is open, you can make corrections)
अर्जांमध्ये दुरुस्ती करण्याची मुदत – 12 ते 16 मार्च 2021
युजीसी नेट परीक्षेची तारीख – मे महिन्यातील 2 ,3, 4, 5, 6, 7, 10, 11, 12, 14 आणि 17 तारीख
उमेदवार अर्जांमध्ये दुरुस्ती करण्याबरोबरच स्कॅन केलेल्या फोटोही एडिट करू शकणार आहेत. एनटीएने युजीसी नेट अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची ही शेवटची संधी दिली आहे. एनटीएने अलिकडेच परीक्षेच्या अर्ज नोंदणीची अंतिम तारीख वाढवली होती. यापूर्वी अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 2 मार्च निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर मुदतवाढ देऊन एनटीएने अंतिम मुदत 9 मार्चपर्यंत वाढवली. त्याचबरोबर फी जमा करण्यासाठी उमेदवारांना 10 मार्चपर्यंत मुदत दिली होती. युजीसी नेट परीक्षा जून आणि डिसेंबरमध्ये अशी वर्षातून दोनदा घेतली जाते. परंतु गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे जूनमध्ये ही परीक्षा घेण्यात आली नव्हती. दुरुस्तीसाठी उमेदवारांना अतिरिक्त फी भरावी लागेल. अतिरिक्त शुल्क (लागू असल्यास) संबंधित उमेदवार क्रेडिट / डेबिट कार्ड / नेट बँकिंग / यूपीआय आणि पेटीएम वॉलेटद्वारे भरु शकतात.
– Ugcnet.nta.nic.in वर एनटीए युजीसीच्या अधिकृत साईटवर जा.
– मुख्य पृष्ठावर उपलब्ध अॅप्लिकेशन करेक्शन विंडो लिंकवर क्लिक करा.
– लॉगिन तपशील प्रविष्ट करा मग आपले अॅप्लिकेशन ओपन होईल.
– अर्जात आवश्यक ते बदल करा.
– सबमिटवर क्लिक करा, आपले बदल जतन होतील.
– अर्ज डाऊनलोड करा आणि त्याची हार्ड कॉपी ठेवा. (The correction window of UGC NET exam application is open, you can make corrections)
मोठी संधी ! 12 लाखांची Mahindra Scorpio आता फक्त 1.33 लाखामध्ये, जाणून घ्या काय आहे ऑफर?https://t.co/TwOMl5uXIW#mahindratractors | #mahindra | #mahindracars
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 12, 2021
संबंधित बातम्या
एसएससी सीएचएसएल परीक्षा 12 एप्रिलपासून, 30 दिवसांच्या क्रॅश कोर्ससह होईल तयारी पक्की
एआयसीटीईचा मोठा निर्णय, अभियांत्रिकी अभ्यासासाठी गणित, भौतिक आणि रासायनशास्त्र आवश्यक नाही