युजीसीचा एक नवीन उपक्रम आलाय, सायबर सिक्युरिटीचा अभ्यास विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. सायबर क्राइमच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीला सायबर सुरक्षेची माहिती असणं गरजेचं आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून यूजी आणि पीजी स्तरावर सायबर सुरक्षेचा अभ्यास सक्तीचा केला जाणार आहे.
यूजीसीच्या समितीने सायबर सुरक्षेत विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाचा मसुदा तयार केला आहे. पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम 75 तासांचा असेल. या कोर्स अंतर्गत 45 तास थिअरी, तर 30 तास प्रॅक्टिकल असेल.
6 ऑक्टोबर 2022 रोजी सायबर जनजागृती दिन निमित्त वेबिनार आयोजित करण्यात आलं होतं. यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी सायबर सुरक्षेचा अभ्यास पूर्ण करण्याची घोषणा केली. एम. जगदीश कुमार यांनी वेबिनारमध्ये या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली.
ते म्हणाले की, विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा प्रोग्राम अनिवार्य करण्याचा उद्देश अधिक जागरूक, प्रतिसादात्मक आणि जबाबदार डिजिटल नागरिक तयार करणे हा आहे.
विद्यार्थी सायबर सुरक्षा आणि धोके अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात. विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान आणि सुरक्षेसाठी लागणारी कौशल्ये शिकता येणार आहेत.
सतत वाढत असलेल्या सायबर धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी, माहिती तंत्रज्ञानाचे परिमाण टाळण्यासाठी अशी कौशल्ये विकसित करावी लागतात. ज्यांचे नियोजन, अंमलबजावणी आणि देखरेख विद्यार्थी करू शकतात.
सायबर सुरक्षेचे अधिकार, नियामक, कायदेशीर, आर्थिक, पर्यावरणीय, सामाजिक आणि नैतिक संदर्भ विद्यार्थ्यांना समजू शकतील.
विद्यार्थ्यांना जबाबदारीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्यास शिकणे हा या सगळ्याचा उद्देश आहे.
सायबर सिक्युरिटी कोर्समध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या पासवर्डचे संरक्षण कसे करावे, फोन ॲप्लिकेशन्स, डिजिटल पेमेंट सिक्युरिटी, वायफाय सिक्युरिटी, सायबर लॉ, सोशल मीडिया सिक्युरिटी, ई-कॉमर्स आणि डिजिटल पेमेंट्स इत्यादींचे व्यवस्थापन कसे करावे, याचे शिक्षण दिले जाणार आहे.