मुंबई: बारावीचा निकाल (HSC Results 2022) बुधवारी (8 जून, 2022) लागणार आहे! बारावीच्या निकालाचे सर्व ताजे अपडेट्स टीव्ही 9 मराठीच्या विभागात पाहायला मिळेल. बारावीच्या विद्यार्थ्यांना आपले गुण टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर https://www.tv9marathi.com/career चेक करता येऊ शकणार आहेत. त्यासाठी एक सोपी पद्धत विद्यार्थ्यांना आणि पालकांना फॉलो करावी लागेल. वेगवान आणि अचूक निकाल जाणून घेण्यासाठी फक्त एकच गोष्ट करावी लागेल. ती म्हणजे टीव्ही 9 मराठीची वेबसाईट फॉलो करावी लागेल. जून 2022 च्या दुसऱ्या आठवड्यात बारावीचा निकाल लागणार अशी माहिती मागच्याच आठवड्यात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी दिली होती. त्यानंतर विद्यार्थी आणि पालकवर्ग सगळ्यांचं लक्ष या निकालाकडे लागलं होतं. वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार बारावीचा निकाल अगदी वेळेत लागणार आहे. उद्या दुपारी एक वाजता निकाल जाहीर होईल. नेमक्या याच वेळेस बारावीच्या विद्यार्थ्यांना बारावीचा निकाल टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर लाईव्ह पाहता येऊ शकणार नाही. चला तर हा निकाल कसा पाहायचा, त्याची सोपी पद्धत लगेचच समजून घेऊयात..
निकालाला अवघे काही क्षण आता शिल्लक राहिल्यानं विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली. दुपारी एक वाजता निकाल जाहीर केले जातील. त्यानंतर दुपारी चार वाजता निकालांची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. बारावीच्या परीक्षेला एकूण 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थी बसले होते. कोणत्या शाखेचे किती विद्यार्थी बसले होते, हे जाणून घेऊयात..
सायन्स : 6लाख 32 हजार 994
आर्ट्स : 4 लाख 37 हजार 336
कॉमर्स : 3 लाख 64 हजार 362
व्यावसायिक अभ्यासक्रम : 50 हजार 202