नवी दिल्ली : भारतीय विद्यार्थ्यांनी (Indian Students) पाकिस्तानातील (Pakistan) कोणत्याही महाविद्यालयात किंवा शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेऊ नये. असं केल्यास ते आपल्या देशात कोणतीही नोकरी किंवा उच्च शिक्षण घेण्यास पात्र ठरणार नाहीत असं आवाहन विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) काल (शुक्रवारी) केलंय. चिनी संस्थांमध्ये सुद्धा भारतीयांनी शिक्षण घेऊ नये असा इशारा दिल्यानंतर महिनाभरातच युजीसी आणि एआयसीटीईने विद्यार्थ्यांना संयुक्तपणे हा सल्ला दिलेला आहे. पाकिस्तानातील कोणत्याही पदवी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिकाला किंवा परदेशी नागरिकाला पाकिस्तानमध्ये मिळालेल्या या शैक्षणिक पात्रतेचा भारतात उपयोग होणार नाही. थोडक्यात, पाकिस्तानातील शैक्षणिक पात्रतेच्या आधारे भारतात नोकरी मिळवता येणार नाही असं स्पष्ट करण्यात आलंय.
” सर्वांना (विद्यार्थ्यांना) उच्च शिक्षणासाठी पाकिस्तानात न जाण्याचा सल्ला देण्यात आलाय. भारतीय वंशाच्या (ओआयसी) कोणत्याही भारतीय नागरिकाला किंवा भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकाला पाकिस्तानातील एखाद्या महाविद्यालयात किंवा एखाद्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घ्यायचा असेल तर यापुढे पाकिस्तानी प्रमाणपत्राच्या आधारे भारतात नोकरी किंवा उच्च शिक्षणासाठी पात्र ठरणार नाही. त्यांना गृह मंत्रालयाकडून सुरक्षा मंजुरी मिळाल्यास ते भारतात रोजगार मिळण्यास पात्र ठरतील.
UGC & AICTE has advised students not to travel to Pakistan for pursuing higher education. pic.twitter.com/L1vl5XmotQ
— ANI (@ANI) April 23, 2022
एआयसीटीईचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे यांच्या मते, भारतीय विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी कोणत्या देशात जायला हवं आणि कोणत्या शिक्षण संस्थेत प्रवेश घ्यायला हवा याबाबतचा सल्ला देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर युजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार म्हणाले,’विद्यार्थी परदेशात परत जाऊन शिक्षण सुरु ठेऊ शकत नाहीत, अशा अनेक समस्यांचा त्यांना सामना करावा लागतो त्यामुळे देशाबाहेर उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी युजीसी आणि एआयसीटीई अशा जाहीर सूचना जारी करतं.’
इतर बातम्या :