नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (National Testing Agency) नेट डिसेंबर 2021 आणि नेट जून 2022 सत्राच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) आज आहे. याआधी अर्ज करायची शेवटची तारीख 20 मे 2022 होती जी नंतर 30 मे करण्यात आली. याच दरम्यान NTA कडून उमेदवारांसाठी करेक्शन विंडो सुरु करण्यात आलीये. या विंडोवर जाऊन उमेदवार फॉर्म भरताना झालेल्या चुका सुधारू शकतो. अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ugcnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी. अर्जदार यूजीसी नेट अर्ज (UGC NET 2022 Applicaion ) ऑनलाइन पद्धतीनेच जमा करू शकतात. यूजीसी नेट परीक्षा 82 विषयांमध्ये संगणक आधारित पद्धतीने घेण्यात येणार आहे. ज्या अर्जदारांनी व्यवस्थित आणि वेळेत अर्ज जमा केलेला आहे त्या अर्जदारांना युजीसी नेट प्रवेश पत्र 2022 मिळेल.
यूजीसी नेट परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या General कॅटेगरीतील उमेदवारासाठी 1100 रुपये, EWS/OBC-NCL ५५० आणि SC/ST/ PWD / Transgender साठी 275 शुल्क आहे. अर्ज करायची शेवटची तारीख 30 मे 2022 आहे. अर्ज दुरुस्त करण्यासाठीची विंडो 21 मे ते 23 मे या कालावधीत खुली राहणार आहे. जूनमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे.