UGC NET परीक्षेचे फॉर्म आले! अर्जाची मुदत, परीक्षा शुल्क वाचा

| Updated on: Nov 28, 2024 | 2:27 PM

UGC NET December 2024 Registration: UGC NET परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. UGC NET परीक्षेच्या डिसेंबर सत्राचे अर्ज आले आहेत. परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे सुरू करण्यात आली आहे. याविषयी विस्ताराने वाचा.

UGC NET परीक्षेचे फॉर्म आले! अर्जाची मुदत, परीक्षा शुल्क वाचा
ugc net
Follow us on

तुम्ही UGC NET परीक्षेचा अभ्यास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. UGC NET च्या डिसेंबर सत्राची परीक्षा जाहीर झाली आहे. यंदा UGC NET परीक्षा 85 विषयांसाठी घेण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांना यासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी ugcnet.nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करू शकतात. दरम्यान, UGC NET साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी परीक्षेचा पॅटर्न आणि अभ्यासक्रम जाणून घ्या.

UGC NET 2024 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया 19 नोव्हेंबर 2024 रोजी सुरू झाली होती. यामध्ये उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 10 डिसेंबर 2024 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. ही परीक्षा जानेवारी 2025 महिन्यात होणार आहे. नोंदणी कशी करावी, याची माहिती खाली जाणून घ्या.

UGC NET परीक्षेची नोंदणी कशी करावी?

  • स्टेप 1: ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाईट- ugcnet.nta.ac.in यावर जावे लागेल.
  • स्टेप 2: वेबसाईटच्या होम पेजवरील नवीन अपडेट्सच्या लिंकवर क्लिक करा.
  • स्टेप 3: पुढील पृष्ठावर, एनटीए UGC NET डिसेंबर 2024 ऑनलाईन फॉर्मच्या लिंकवर जा.
  • स्टेप 4: आता इथे रजिस्ट्रेशनच्या लिंकवर क्लिक करा.
  • स्टेप 5: विनंती केलेल्या तपशीलांसह नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
  • स्टेप 6: रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही अर्ज भरू शकता.
  • स्टेप 7: अर्ज केल्यानंतर प्रिंटआऊट घ्या.

कोण करू शकतो अर्ज?

UGC NET 2024 परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. प्रथम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थीही यासाठी अर्ज करण्यास पात्र मानले जातात. लक्षात ठेवा की, 55 टक्के गुण मिळालेलेच अर्ज करू शकतात. UGC NET परीक्षेत अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 31 वर्षापेक्षा कमी असावे.

UGC NET पात्रता निकष काय?

UGC NET 2024 डिसेंबर परीक्षेला बसण्यासाठी सामान्य उमेदवाराकडे 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. तर ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी हा निकष 50 टक्के निश्चित करण्यात आला आहे.

नेट पात्र उमेदवार तीन श्रेणींसाठी पात्र

नव्या नियमांनुसार नेट परीक्षेत पर्सेंटाइल जास्त असलेले श्रेणी 1 मध्ये ठेवण्यात येणार आहे. हे उमेदवार सहाय्यक प्राध्यापक, जेआरएफ आणि पीएचडीसाठी पात्र मानले जातील. अधिक पर्सेंटाइल असलेल्या उमेदवारांना पीएचडी प्रवेशासाठी केवळ मुलाखतीला उपस्थित राहावे लागेल.

नेट पात्र उमेदवार श्रेणी 2

मध्यम पर्सेंटाइल असलेल्या उमेदवारांना श्रेणी 2 मध्ये ठेवण्यात येणार असून, त्यांना सहाय्यक प्राध्यापक आणि पीएचडीप्रवेशासाठी पात्र मानले जाईल.

नेट पात्र उमेदवार श्रेणी 3

नेट परीक्षेत सर्वात कमी पर्सेंटाइल मिळविणाऱ्या उमेदवारांचा क्रमांक येतो. त्यांना श्रेणी 3 मध्ये ठेवण्यात येणार असून ते केवळ पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र असतील.

पीएचडी प्रवेश गुणवत्ता यादी

नेट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या नेट पर्सेंटाइलला 70 टक्के, तर मुलाखतीला 30 टक्के वेटेज देण्यात येणार आहे. कॅटेगरी 2 आणि कॅटेगरी 3 या दोन्ही कॅटेगरीतील नेट स्कोअर केवळ एका वर्षासाठी वैध असेल.