नुकताच यूपीएससीचा निकाल जाहिर करण्यात आलाय. या निकालामध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा दबदबा हा बघायला मिळतोय. या परीक्षेत आदित्य श्रीवास्तव याने टॉप केले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने सिव्हिल सेवा परीक्षा 2023 चा हा अंतिम निकाल जाहीर केला आहे. या निकालात महाराष्ट्रातील उमेदवारांना घणघणीत यश मिळाले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ऑल इंडिया रॅंकींनुसार अर्चित डोंगरेला 153 रँक मिळाली आहे. हेच नाही तर पहिल्या 100 जणांच्या यादीमध्ये अनिकेत हिरडे 81 व्या रँकवर आहे.
या परीक्षेचा निकाल उमेदवारांना upsc.gov.in या साईटवर बघता येईल. 2023 मध्ये यूपीएससीकडून 1143 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर मुख्य परीक्षेमध्ये पास झालेल्या उमेदवारांना 9 एप्रिल 2024 रोजी मुलाखतीसाठी बोलवण्यात आले होते आणि आज याचा निकाल जाहिर करण्यात आला.
विशेष म्हणजे या निकालात 70 हून अधिक उमेदवार हे महाराष्ट्रातील आहेत. या परीक्षेसाठी देशभरातून लाखो विद्यार्थी हे अर्ज करतात. मात्र, परीक्षेमध्ये काही प्रमाणात विद्यार्थी उत्तीर्ण होतात. त्यानंतर मुलाखती पार पडतात आणि या मुलाखतींमधून शेवटी निवड केली जाते. यूपीएससीची परीक्षा अत्यंत अवघड असते. उमेदवार या परीक्षेची तयारी अनेक वर्षे करतात.
I congratulate all those who have successfully cleared the Civil Services Examination, 2023. Their hard work, perseverance and dedication has paid off, marking the start of a promising career in public service. Their efforts will shape the future of our nation in the times to…
— Narendra Modi (@narendramodi) April 16, 2024
आदित्य श्रीवास्तव याने ही परीक्षा टाॅप केली असून दुसऱ्या क्रमांकावर अनिमेष प्रधान हा आहे. तिसऱ्या क्रमांकावर अनन्या रेड्डी आहे. आयएएस, आयएफएस आणि आयपीएस या पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेची मार्कशीट उमेदवारांना लगेचच मिळणार नाहीये.
मार्कशिटसाठी उमेदवारांना 15 दिवस वाट बघावी लागणार आहे. पंधरा दिवसांनंतर उमेदवारांना मार्कशीट मिळणार आहे. या परीक्षेच्या मुलाखतीसाठी 2846 उमेदवारांना बोलवण्यात आले होते. 1143 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली गेली. नरेंद्र मोदी यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यूपीएससीमध्ये पास झालेल्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.