UPSC CSE Prelims Result 2023: रोल नंबरच्या मदतीने निकाल तपासा, डायरेक्ट लिंक!

| Updated on: Jun 12, 2023 | 1:20 PM

UPSC CSE Prelims 2023: यूपीएससी upsc.gov.in अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर करण्यात आला आहे. पूर्व परीक्षा 28 मे 2023 रोजी घेण्यात आली होती. यूपीएससी सीएसई प्रीलिम्स परीक्षा 2023 मध्ये एकूण 14624 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यूपीएससी सीएसई मुख्य परीक्षा 15 सप्टेंबर 2023 पासून आयोजित केली जाईल.

UPSC CSE Prelims Result 2023: रोल नंबरच्या मदतीने निकाल तपासा, डायरेक्ट लिंक!
UPSC CSE Prelims result 2023
Image Credit source: Social Media
Follow us on

नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 चा निकाल आज, 12 जून 2023 रोजी जाहीर केला आहे. यूपीएससी upsc.gov.in अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर करण्यात आला आहे. पूर्व परीक्षा 28 मे 2023 रोजी घेण्यात आली होती. यूपीएससी सीएसई प्रीलिम्स परीक्षा 2023 मध्ये एकूण 14624 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यूपीएससी सीएसई मुख्य परीक्षा 15 सप्टेंबर 2023 पासून आयोजित केली जाईल.

आयोगाने नागरी सेवेसह भारतीय वनसेवा परीक्षेचा निकालही जाहीर केला आहे. आता सर्व यशस्वी उमेदवारांना पुन्हा मुख्य परीक्षेसाठी अर्ज करावा लागणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइटवर जारी केलेली नोटीस पाहू शकतात.

UPSC CSE Prelims Result 2023 डायरेक्ट लिंक

UPSC CSE Prelims Result 2023 कसा चेक करणार?

  • UPSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या upsc.gov.in.
  • नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 निकालाच्या होम पेजवर दिलेल्या लिंकवर क्लिक करा
  • PDF तुमच्या स्क्रीनवर दिसेल
  • आता रोल नंबरच्या मदतीने निकाल तपासा