यूपीएससीची सिव्हिल सर्व्हिस 2021 परीक्षेचा निकाल (UPSC 2021 Final Results) काल जाहीर करण्यात आला आणि इतर परीक्षांप्रमाणेच या परीक्षेत सुद्धा मुलींनी बाजी मारली! श्रुती शर्माने ऑल इंडिया पहिला क्रमांक (Shruti Sharma UPSC AIR 1) पटकावला आहे. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरही मुलींनी स्थान पटकावलं आहे. अंकिता अग्रवाल दुसऱ्या, गामिनी सिंगला तिसऱ्या आणि ऐश्वर्या वर्मा चौथ्या स्थानावर आहे. संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या श्रुतीने सांगितले की, तिचा निकाल चांगला लागेल अशी अपेक्षा होती, पण अव्वल येण्याची अपेक्षा नव्हती. महाराष्ट्रात सुद्धा अनेक विद्यार्थी यूपीएससी 2021 च्या निकालात उत्तीर्ण झाले. काल देशभर या मुलांचं कौतुक करण्यात आलं. ज्याने त्याने आपला विजय आपापल्या पद्धतीनं साजरा केला. या टॉपर्सने (UPSC Toppers) नेमका अभ्यास कसा केला? त्यांचा ऑप्शनल विषय कोणता होता ज्या आधारे त्यांना यूपीएससी उत्तीर्ण होण्यास मदत झाली. जाणून घेऊयात…
यूपीएससी सीएसई रँक 3 गामिनी सिंगला ही पंजाबच्या आनंदपूर साहिब येथील रहिवासी आहे. तिने २०१९ मध्ये पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयातून संगणक विज्ञान अभियांत्रिकीमध्ये बीटेक संगणक विज्ञान पदवी प्राप्त केलीये. तिला कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकरी मिळाली पण यूपीएससीची तयारी करायची म्हणून गामिनीने ही ऑफर नाकारली. यूपीएससी वैकल्पिक विषयात गामिनीने समाजशास्त्राची निवड केली होती.
यूपीएससी सीएसई 2021च्या निकालात पहिल्या 25 उमेदवारांमध्ये 15 मुले आणि 10 मुली आहेत. त्यांची शैक्षणिक पात्रता इंजिनिअरिंग, बी.टेक आहे अशी माहिती केंद्रीय लोकसेवा आयोगाने दिलीये. बीई, आर्टस्/ आर्टस् ह्युमॅनिटीजमध्ये पदवी, वाणिज्य शाखेतील पदवी. आयआयटी,एम्स, व्हीआयटी, मुंबई विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, जीबी पंत विद्यापीठ, पंजाब इंजिनिअरिंग कॉलेज अशा संस्थांमधून या टॉपर्सनी शिक्षण घेतले आहे.
आयएएस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पहिल्या 25 उमेदवारांनी यूपीएससी नागरी सेवेसाठी मानववंशशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, हिंदी साहित्य, गणित, वैद्यकीय विज्ञान, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध, लोकप्रशासन, समाजशास्त्र आणि प्राणीशास्त्र हे वैकल्पिक विषय निवडले आहेत.