UPSC Success Story: कर्णबधिर असून विना सवलत, विना कोचिंग पहिल्याच प्रयत्नात IAS! ही होती सौम्या शर्मा यांची रणनीती

| Updated on: Jun 17, 2023 | 12:48 PM

सौम्या शर्मा यांनी दिल्लीतील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (NLU) मधून कायद्याचे शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी एनएलयूमध्ये काम केल्यानंतर लगेचच 2017 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा दिली. वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी हा प्रवास सुरू केला.

UPSC Success Story: कर्णबधिर असून विना सवलत, विना कोचिंग पहिल्याच प्रयत्नात IAS! ही होती सौम्या शर्मा यांची रणनीती
Soumya sharma IAS Officer
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: UPSC प्रेरणादायी किस्से अनेकदा समोर येतात आणि अशीच एक कथा आहे सौम्या शर्माची. आज आपण भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी सौम्या शर्मा यांची कहाणी जाणून घेणार आहोत, तुम्हाला जणू आश्चर्य वाटेल सौम्या शर्मा इतकी अवघड परीक्षा कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय पास झाल्यात. सौम्या शर्मा यांनी दिल्लीतील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (NLU) मधून कायद्याचे शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी एनएलयूमध्ये काम केल्यानंतर लगेचच 2017 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा दिली. वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी हा प्रवास सुरू केला.

अनेक उमेदवारांप्रमाणे सौम्या शर्मा यांनी UPSC ची तयारी करण्यासाठी कोणत्याही कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी त्याने परीक्षेची तयारी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट सीरीजचा आधार घेतला. यानंतर त्या पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने हे स्वयंअध्ययन फार फायदेशीर ठरले.

मुख्य परीक्षेच्या आठवडाभर आधी सौम्याला प्रचंड ताप आला. मात्र आजारपण असूनही 102-103 डिग्री ताप असताना सुद्धा त्या परीक्षेला बसल्या होत्या. सौम्याला परीक्षेच्या हॉलमध्ये सुट्टीच्या वेळीही दिवसातून तीन वेळा सलाईन ड्रीप देण्यात आले.

सौम्या शर्मा कर्णबधिर असूनही त्यांनी कोणत्याही सवलतीवर विसंबून न राहता सर्वसाधारण प्रवर्गात अर्ज केला. प्रश्न पटकन समजून घेण्याची आणि विश्लेषण करण्याची त्यांची क्षमता तसेच सामान्य ज्ञानातील त्यांचा भक्कम पाया यामुळे त्यांना यश मिळाले.

सौम्या शर्माने पहिल्याच प्रयत्नात वयाच्या 23 व्या वर्षी यूपीएससी परीक्षेत देशभरात नववा क्रमांक मिळवत नेत्रदीपक स्थान पटकावले. त्यांची जिद्द आणि चिकाटी स्पर्धा परीक्षेत यश मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी प्रेरणादायी ठरते.