यूपीएससीची सिव्हिल सर्व्हिस 2021 परीक्षेचा निकाल जाहीर (UPSC Final Result) करण्यात आलाय आणि इतर परीक्षांप्रमाणेच या परीक्षेत सुद्धा मुलींनी बाजी मारलीये! श्रुती शर्माने ऑल इंडिया पहिला क्रमांक (All India Topper Shruti Sharma) पटकावला आहे. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरही मुलींनी स्थान पटकावलं आहे. अंकिता अग्रवाल दुसऱ्या, गामिनी सिंगला तिसऱ्या आणि ऐश्वर्या वर्मा चौथ्या स्थानावर आहे. संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या श्रुतीने सांगितले की, तिचा निकाल चांगला लागेल अशी अपेक्षा होती, पण अव्वल येण्याची अपेक्षा नव्हती. दुसऱ्या क्रमांकावर असलेली अंकिता अग्रवाल (Ankita Agarwal UPSC) इतिहास विषयाची विद्यार्थिनी आहे. तिने दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून पदवी आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. यासह, तिने जामिया मिलिया इस्लामिया रेसिडेन्शियल कोचिंग अकादमीकडून सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी केली.
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) आणि भारतीय पोलिस सेवा (IPS) यासह अन्य पदांसाठी दरवर्षी तीन टप्प्यांत नागरी सेवा परीक्षा घेण्यात येतात. या परीक्षेत जामिया मिलिया कोचिंग अकादमीचे 23 उमेदवार यशस्वी झाले आहेत.
टॉपर बनल्यानंतर श्रुती शर्माने आपल्या यशाचं संपूर्ण श्रेय जामिया मिलिया इस्लामिया रेसिडेन्शियल कोचिंग अॅकॅडमीला दिलं आणि म्हटलं की, मी इथे नसते तर कदाचित मी टॉपर झाले नसते.