नवी दिल्ली : कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET) पुढील वर्षापासून म्हणजेच 2023 पासून दोनदा घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता जे विद्यार्थी पहिल्या परीक्षेत (Examination) चांगले गुण मिळवू शकले नाहीत त्यांच्याकडे चांगले गुण (Marks) मिळवायची अजून एक संधी उपलब्ध असणार आहे. पुढच्या वर्षापासून या दोन्ही परीक्षा बारावीच्या परीक्षेनंतर 45 दिवसांच्या अंतराने घेतल्या जातील. जे विद्यार्थी पहिल्या संधीत चांगला स्कोअर करू शकले नाहीत ते दुसऱ्या ते दुसऱ्यांदा परीक्षा देऊन स्कोअर करू शकतात. सीयूईटी परीक्षा बारावीच्या एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.
यावेळी होणाऱ्या सीयूईटी परीक्षेच्या रजिस्ट्रेशनसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून 6 मे ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. ही आहे पदवीपूर्व सीयूईटी. आता पुढील आठ्वड्यापर्यंत एनटीए पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीयूईटीचं वेळापत्रक जाहीर करणार आहे. पदवीपूर्व प्रवेशाच्या सीयूईटी परीक्षेसाठी 2 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केलीये. सीयूईटी 2022 ची प्रवेश परीक्षा एकूण 13 भाषांमध्ये घेतली जाणार आहे.
सर्व 45 केंद्रीय विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमांमध्ये सीयूईटी गुणांच्या आधारे प्रवेश दिला जाणार आहे. म्हणजेच आता विद्यापीठात प्रवेश घेताना बारावीच्या गुणांना महत्त्व उरणार नाही. बोर्ड परीक्षेतील गुणांचा वापर विद्यापीठ सीयूईटी पात्रता निकष म्हणून केला जाईल. यूजीसीकडून अनुदानित सर्व 45 केंद्रीय विद्यापीठांसाठी सीयूईटी अनिवार्य केलीये.
इतर बातम्या :