CBSE Exam 2022 : ‘ऐन परीक्षेत समजा विद्यार्थ्याला कोरोना झाला तर…?’, ‘सीबीएसई’ ने केली सोय, विद्यार्थी निश्चिंत…

| Updated on: May 05, 2022 | 6:08 PM

त्याचबरोबर कोविड-19 च्या केसेस सुद्धा वाढू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत, प्रत्येकाला कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करण्याचा तसेच उष्णतेपासून त्यांचे संरक्षण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

CBSE Exam 2022 : ऐन परीक्षेत समजा विद्यार्थ्याला कोरोना झाला तर...?, सीबीएसई ने केली सोय, विद्यार्थी निश्चिंत...
'सीबीएसई' ने केली सोय, विद्यार्थी निश्चिंत...
Image Credit source: TV9 marathi
Follow us on

नवी दिल्ली  : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावी बारावी परीक्षा (Board Exam)देणाऱ्या विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण नोटीस बजावली आहे. सीबीएसईने कोविड-19 (Covid-19) संक्रमित विद्यार्थ्यांबाबत मोठी घोषणा केली आहे. कोरोना व्हायरस संसर्गामुळे जर एखादा विद्यार्थी दहावी किंवा बारावीची परीक्षा देऊ शकला नाही तर अशा विद्यार्थ्यांचा बोर्डाकडून टर्म-1 च्या कामगिरीच्या आधारे अंतिम निकाल मिळणार आहे असं सीबीएसई परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सांगितलंय. सीबीएसई बोर्ड कोविड-19 प्रोटोकॉल लक्षात घेऊन परीक्षा घेत आहे. संयम भारद्वाज म्हटले की, बोर्डाच्या परीक्षेवेळी विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्यास त्या विद्यार्थ्याला कोविड रिपोर्ट सहित संपूर्ण माहिती द्यावी लागेल.

कंपार्टमेंट परीक्षेचे नियम

संयम भारद्वाज म्हणाले, बोर्डाच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट कॅटेगरीमध्ये ठेवले तरच कंपार्टमेंट परीक्षा देता येईल. बोर्ड विद्यार्थ्यांना कोणत्याही दोन विषयांमध्ये कंपार्टमेंट परीक्षेला बसण्याची परवानगी देते. या परीक्षा पाच ते सात दिवसांच्या कालावधीत घेतल्या जातात. त्याचबरोबर बारावीसाठी विद्यार्थ्यांना कंपार्टमेंटची परीक्षा एका दिवसात घेतल्या जातात.

CBSE मार्गदर्शक तत्त्वे

सीबीएसई बोर्डाने दहावी आणि बारावीची टर्म 2 ची परीक्षा सुरु होण्यापूर्वी विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वं जारी केली होती. सीबीएसई बोर्ड परीक्षा केंद्रातील प्रत्येकाला या मार्गदर्शक तत्वांचं सक्तीने पालन करावं लागणार आहे. आजकाल देशाच्या विविध भागात उष्णतेची लाट सुरु आहे. त्याचबरोबर कोविड-19 च्या केसेस सुद्धा वाढू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत, प्रत्येकाला कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करण्याचा तसेच उष्णतेपासून त्यांचे संरक्षण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा