नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (National Testing Agency) सध्या देशभरात केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा-यूजी (CUET-UG) घेण्यात येत आहे. सीयूईटी-पीजी परीक्षाही 1 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. यंदा पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना केवळ ‘सीयूईटी’च्या गुणांच्या आधारेच प्रवेश देण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत परीक्षा देणारे विद्यार्थी आपापल्या निकालाची आतुरतेने वाट पाहत असतात. आता विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी सीयूईटी यूजी आणि सीयूईटी पीजी या दोन्ही प्रवेश परीक्षांच्या निकालाबाबत मोठी माहिती दिली आहे.
युजीसी प्रमुख म्हणाले की, “सीयूईटी यूजीचा निकाल 10 सप्टेंबरपर्यंत आणि सीयूईटी पीजीचा निकाल 25 सप्टेंबरपर्यंत जाहीर होण्याची अपेक्षा आहे. एका वृत्तपत्राशी बोलताना ते म्हणाले, “शेवटच्या चाचणीच्या तारखेपासून साधारणत: 10 दिवसांच्या आत निकाल जाहीर केला जावा.” यापूर्वी एनटीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पुष्टी केली होती की सीयूईटी यूजीचा निकाल 7 सप्टेंबरपर्यंत जाहीर केला जाईल. “सीयूईटी-यूजीसाठी विषयांच्या पेपरची संख्या खूप जास्त आहे. आम्ही मूल्यांकन पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि 7 सप्टेंबरपर्यंत निकाल जाहीर करू. आम्ही 10 सप्टेंबर हा जास्तीत जास्त वेळ मानला आहे.”
सीयूईटी-यूजी परीक्षेचा सहावा आणि अंतिम टप्पा 30 ऑगस्ट रोजी संपणार आहे. सुरुवातीला, सीयूईटी दोन टप्प्यात विभागली गेली होती. मात्र, दुसऱ्या टप्प्यात वारंवार तांत्रिक त्रुटी राहिल्याने अनेक केंद्रांवर परीक्षा रद्द करावी लागली, तसेच परीक्षा पुढे ढकलावी लागली. या परीक्षेचा दुसरा टप्पा 4 ते 6 ऑगस्ट दरम्यान पार पडला. सीयूईटी आता सहा टप्प्यात घेण्यात येत आहे आणि ३० ऑगस्ट रोजी संपेल. यापूर्वी, सीयूईटी यूजी परीक्षेची अंतिम तारीख 20 ऑगस्ट रोजी निश्चित केली गेली होती.
त्याचबरोबर सीयूईटी पीजीच्या अधिकृत वेळापत्रकानुसार 1 ते 11 सप्टेंबर दरम्यान सीयूईटी पीजी परीक्षा होणार आहेत. प्रवेश परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. सकाळच्या शिफ्टमध्ये सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत परीक्षा होणार आहे, तर दुपारच्या शिफ्टमध्ये दुपारी 3 ते 5 या वेळेत परीक्षा होणार आहे. शिवाय, एनटीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सीयूईटी पीजी 2022 सिटी इनमेशन स्लिप 26 ऑगस्ट रोजी जारी केली जाईल, तर परीक्षेचे प्रवेशपत्र 28 किंवा 29 ऑगस्ट रोजी जाहीर केले जाऊ शकते. त्या नंतर लगेचच काही दिवसात त्याचा निकालही लावला जाईल. युजीसी प्रामुख्यांच्या माहितीनुसार सीयूईटी यूजीचा निकाल १० सप्टेंबरपर्यंत आणि सीयूईटी पीजीचा निकाल २५ सप्टेंबरपर्यंत जाहीर होण्याची अपेक्षा आहे