पुणे: टीईटी परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. जीए सॉफ्टवेअर कंपनीचे डॉ. प्रीतीश देशमुख यांच्या चौकशीनंतर देशमुख यांचा हा घोटाळा उघड झाला आहे. कुंपनच शेत खात असल्याचं या घोटाळ्यामुळे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
तुकाराम सुपे हे महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण परीषदेचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे आहे. सुपे यांच्यावर युवाशाही आणि एमपीएससी समन्वय समिती आधीपासूनच नाराज होती. उत्तर सूची आणि प्रश्न सूचीत तफावत असल्याची तक्रार या दोन्ही संघटनेकडून करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणाची चौकशी झाली नव्हती. तसेच शिक्षण परिषदेने या तक्रारीवर आपलं उत्तरही दिलं नव्हतं. त्यामुळे या विद्यार्थी संघटनांचा संशय अधिकच बळावला होता. त्यानंतर हा घोटाळा उघड झाल्याने सुपे यांचे काळे कारनामेही उघड झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून महाटीईटी आणि शिष्यवृत्ती परीक्षांचं आयोजन केलं जातं. बीएड आणि डीएड झालेल्या विद्यार्थ्यांची शिक्षक पात्रता परीक्षा घेतली जाते. विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षकांच्या पात्रता परीक्षेची जबाबदारी असलेल्या तुकाराम सुपे यांनाच अटक झाल्यानं टीईटी परीक्षेसंदर्भात कुंपणानंच शेत खालल्याचा संशय निर्माण झाला आहे.
म्हाडा पेपर फुटी प्रकरणात अटकेत असलेले आरोपी डॉ. प्रीतिश देशमुख यांचा घरी पोलिसांनी धाड टाकली होती. देशमुख यांच्या घराची झाडाझडती घेत असताना टीईटी परीक्षेची ओळखपत्र सापडल्यानंतर पुणे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी देशमुखांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी सुपेंचं नाव घेतलं. त्यानंतर पोलिसांनी थेट सुपेंकडे मोर्चा वळवला. सुपेंना ताब्यात घेऊन त्यांची दिवसभर चौकशी केली. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे पोलीस एका घोटाळ्याचा तपास करायला गेले आणि दुसराच घोटाळा उघड होऊन आरोपी गजाआड झाला.
या घोटाळ्याची मोड्स ऑपरेंडी समोर आली आहे. पुणे पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. ज्या उमेदवारांना सिलेक्ट करायचे आहे त्यांना काही सूचना दिल्या जायच्या. परीक्षा देताना त्यांना ओएमआर शीट्स न भरण्यास सांगितलं जातयंच स्कॅनिंगच्यावेळी त्यांची शीट भरली जायची. त्यातील काही उमेदवारांना रिचेकिंगसाठी अर्ज करण्यास सांगितलं जायचं. त्यांचा रिचेकिंगचा अर्ज आला की गैरप्रकार केला जायचा.
या उमेदवारांकडून पूर्व परीक्षेसाठी 35 हजार ते एक लाख रुपये घेतले जायचे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जानेवारी 2020मध्ये झालेल्या परीक्षेत हा घोटाळा झाला होता. अजूनही इतर परीक्षेत घोटाळा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संबंधित बातम्या:
भुसावळमध्ये भाजपला भगदाड, 21 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश; नाथाभाऊंच प्रचंड शक्तीप्रदर्शन
जॅकलिन, नोरा, शिल्पासह ‘या’ 12 अभिनेत्रींसोबत सुकेशचे कोल्ज कनेक्शन? ईडीसमोर खळबळजनक खुलासे
Asian Championship: हॉकीच्या मैदानात भारताने पाकिस्तानला लोळवलं, हरमनप्रीत-आकाशदीप ठरले हिरो