चीनमध्ये विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना Gaokao परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. अलिकडेच ऑनलाइन सर्च प्लॅटफॉर्म Erudera यांनी Gaokaoपरीक्षेचे वर्णन जगातील सर्वात कठीण परीक्षा असे केले आहे. ही परीक्षा अमेरिकन SAT आणि भारताच्या IIT-JEE सारखीच आहे. Gaokao म्हणजे चिनी भाषेत उच्च परीक्षा. विद्यार्थी या परीक्षेची 12 वर्षे तयारी करतात. चिनी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा हा एकमेव निकष आहे.
Chinese Gaokao Exam दोन दिवस चालते आणि मुलांना रोज 10 तास परीक्षा द्यावी लागते. या काळात त्यांना काही अत्यंत कठीण प्रश्न विचारले जातात.
ही परीक्षा इतकी कठीण असते की, लोक म्हणतात की, यामुळे मुलांवर प्रचंड दडपण येतं. अनेक वेळा मुले परीक्षेमुळे आत्महत्याही करतात. मग या परीक्षेत असे काय आहे ज्यामुळे ही परीक्षा इतकी कठीण होते, असा प्रश्न निर्माण होतो.
दरवर्षी 10 दशलक्षाहून अधिक चिनी मुले Gaokao परीक्षा देतात. दरवर्षी जून महिन्यात ही परीक्षा घेतली जाते. विद्यापीठ प्रवेशासाठी ही परीक्षा हा एकमेव पात्रतेचा निकष आहे. या परीक्षेबद्दल बोलायचे झाले तर त्यात चिनी साहित्य, गणित आणि एक परदेशी भाषा (सहसा इंग्रजी) यांचा समावेश होतो.
एखाद्या विद्यार्थ्याने लिबरल आर्ट्सची खासियत म्हणून निवड केल्यास त्याला इतिहास, राजकारण आणि भूगोलाशी संबंधित अतिरिक्त परीक्षा द्याव्या लागतात.
त्याचबरोबर विज्ञानाची निवड करताना विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीची परीक्षा द्यावी लागते. Gaokao परीक्षा देण्याआधी विद्यार्थ्यांना एक फॉर्म भरावा लागतो, ज्यामध्ये ते प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या कॉलेजांची निवड करतात.
प्रत्येक प्रांताच्या कॉलेजमध्ये वेगवेगळ्या गुणांवर प्रवेश दिला जातो. एखाद्या विद्यार्थ्याने Gaokao परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे पात्रतेचे निकष पूर्ण केले, तर त्याला प्रवेश दिला जातो.
मात्र, एखाद्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला नाही, तर त्याला पुन्हा परीक्षा देण्याचा पर्याय आहे. Gaokao परीक्षेसाठी वयाची कोणतीही मर्यादा नाही.