अकोला लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 60 टक्के मतदानाची नोंद झाली. अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार संजय धोत्रे, भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून काँग्रेसचे हिदायत पटेल अशी तिरंगी लढत होती. मात्र ‘बिग फाइट’ ही संजय धोत्रे व प्रकाश आंबेडकर यांच्यातच झाली.
पक्ष | उमेदवार | निकाल |
---|---|---|
भाजप/शिवसेना | संजय धोत्रे (भाजप) | विजयी |
काँग्रेस/ राष्ट्रवादी | हिदायत पटेल (काँग्रेस) | पराभूत |
अपक्ष/इतर | प्रकाश आंबेडकर (VBA) | पराभूत |