चंद्रपूर- वणी- आर्णी लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान झालं. या मतदारसंघात यंदा 64.66 टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का दीड टक्क्यांनी वाढला. हा मतदारसंघ देशात गाजल्याने मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक पाहायला मिळाली. या मतदारसंघात भाजपकडून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर , काँग्रेसकडून बाळू धानोरकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून राजेंद्र महाडोळे यांच्यात प्रमुख लढत झाली. मात्र मतदारसंघात भाजप-काँग्रेस यांच्यात थेट लढत होती.
पक्ष | उमेदवार | निकाल |
---|---|---|
भाजप/शिवसेना | हंसराज अहीर (भाजप) | पराभूत |
काँग्रेस/ राष्ट्रवादी | बाळू धानोरकर (काँग्रेस) | विजयी |
अपक्ष/इतर | अॅड. राजेंद्र महाडोळे (VBA) | पराभूत |