Nagpur Lok Sabha Results : नागपूर लोकसभा निकाल 2019

| Updated on: Jul 05, 2019 | 3:37 PM

नागपूर जिल्ह्यात नागपूर लोकसभा मतदारसंघ आणि रामटेक लोकसभा मतदारसंघ असे दोन मतदारसंघ आहेत. यापैकी नागपूर मतदारसंघ सध्या महाराष्ट्रासह देशभराच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला आहे. कारण केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी हे या मतदारसंघातून रिंगणात उतरले होते. नागपूर लोकसभा निकाल – Nagpur Lok Sabha Result : नागपूर लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला […]

Nagpur Lok Sabha Results : नागपूर लोकसभा निकाल 2019
Follow us on

नागपूर जिल्ह्यात नागपूर लोकसभा मतदारसंघ आणि रामटेक लोकसभा मतदारसंघ असे दोन मतदारसंघ आहेत. यापैकी नागपूर मतदारसंघ सध्या महाराष्ट्रासह देशभराच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला आहे. कारण केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी हे या मतदारसंघातून रिंगणात उतरले होते.

नागपूर लोकसभा निकाल – Nagpur Lok Sabha Result : नागपूर लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 55 टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 2 टक्क्यांनी घटला. या मतदारसंघात मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक आहे. या मतदारसंघात भाजपाकडून विद्यमान खासदार नितीन गडकरी यांना पुन्हा संधी देण्यात आली,  तर काँग्रेसकडून नाना पटोले यांना मैदानात उतरवण्यात आलं. या मतदारसंघात दुहेरी लढत होती.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनानितीन गडकरी (भाजप)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीनाना पटोले (काँग्रेस)पराभूत
अपक्ष/इतरपराभूत

रामटेक लोकसभा निकाल – Ramtek Lok Sabha Result : रामटेक लोकसभा मतदार संघात देशातील पहिल्या टप्प्यात म्हणजे 11 एप्रिल रोजी मतदान झालं. लोकसभा निवडणुकीत याठिकाणी 62.12 टक्के इतकं मतदान पार पडलं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा कमी मतदान झालं. 2014 च्या निवडणुकांमध्ये 62.70 टक्के मतदान झालं होतं. रामटेकमध्ये शिवसेनेचे कृपाल तुमाणे आणि काँग्रेसचे किशोर गजभिये यांच्यात लढत होत आहे.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनाकृपाल तुमाणे (शिवसेना)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीकिशोर उत्तमराव गजभिये (काँग्रेस)पराभूत
अपक्ष/इतरकिरण रोडगे-पाटनकर (VBA)पराभूत